Tuesday, March 10, 2026
Homeजळगावसीमा भारंबे यांच्या साहित्याचा केला गौरव भुसावळ नगरपरिषदेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम

सीमा भारंबे यांच्या साहित्याचा केला गौरव भुसावळ नगरपरिषदेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम

सीमा भारंबे यांच्या साहित्याचा केला गौरव
भुसावळ नगरपरिषदेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम
भुसावळ.    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                  (वा.) परदेशात एखाद्या साहित्यिक किंवा कलावंताच्या घरावर सांस्कृतिक वारसा म्हणून एक विशिष्ट निळ्या रंगाची पाटी लावली जाते. त्याचप्रमाणे भुसावळ नगर परिषदेतर्फे जागतिक महिला दिनाचे आैचित्य साधून संतोषी माता हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात सांस्कृितक वारसा चिन्हाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते रविवार दि. ८ मार्च रोजी करण्यात आले.
याप्रसंगी भुसावळ शहराच्या प्रथम नागरिक स्वतः नगराध्यक्ष गायत्री भंगाळे, ललिता चौधरी यांनी डीएस हायस्कूलमधील शिक्षिका व साहित्यिक सीमा भारंबे यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांस्कृतिक व साहित्याची आेळख म्हणून निळ्या रंगाची पाटी लावली. याप्रसंगी शहरातील अनेक मान्यवर प्रतिष्ठीत महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. प्रा.उत्तम सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला. शहरात लेखिका सीमा भारंबे यांच्या निवासस्थानाला प्रथमच महाराष्ट्रात सांस्कृतिक वारश्याचा दर्जा दिल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील पत्रकार, कवी, लेखक व साहित्यिक मान्यवरांकडून साहित्यिक सीमा भारंबे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या