जैन श्रावक संघातर्फे जागतिक महिला दिनी जेष्ठ महिलांचा सन्मान.
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज ८ मार्च रोजी जागतिक महिला दिना निमित्त भुसावळ येथील जैन श्री श्रावक संघ तर्फे ज्येष्ठ महिलांचा तपस्वीनी भगिनींचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सन्मानपात्र जेष्ठ महिलांचे पाद्यपूजन करून आशिर्वाद घेण्यात आले. या वेळी कांताबाई सुराणा,निर्मलाबाई मेहेता,राधाबाई चोरडीया,सुशिलाबाई चोरडिया,सजनबाई कुमट,सुमतीबाई नहार,डॉ.शितल चोरडीया,आरती साखला यांच्यासह जेष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी जैन संघपती जयंतीलाल सुराणा,जे बी कोटेचा,विनोद मेहता,डॉ.प्रमोद जैन,राजेश बाफना,विशाल चोरडीया,गौतम चोरडीया,जे पी चोरडीया,विजय चोरडीया यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

