Thursday, March 12, 2026
Homeगुन्हाभुसावळातील विठ्ठल मंदिर वॉर्डात रस्त्यावर अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला; गुन्हा दाखल!

भुसावळातील विठ्ठल मंदिर वॉर्डात रस्त्यावर अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला; गुन्हा दाखल!

भुसावळातील विठ्ठल मंदिर वॉर्डात रस्त्यावर अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला; गुन्हा दाखल!

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्डातील लहान हनुमान मंदिरासमोरील रस्त्यावर अनोळखी महिला मृतावस्थेत आढळून आल्याच्या प्रकरणी तिला चिरडल्याच्या संशयावरून जळगाव येथील कारचालकाविरुद्ध बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

३ मार्च रोजी या परिसरातील रस्त्यावर एक अनोळखी महिला मृतावस्थेत आढळून आली होती. तपास पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला होता. तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये संबंधित महिला रस्त्यावर झोपलेल्या अवस्थेत असताना कार काही क्षण त्या ठिकाणी थांबून तिच्या अंगावरून गेल्याचे दिसून आले. फुटेजच्या आधारे तपास करताना कारचा क्रमांक एमएच-१९-ईजी-३६०० असल्याचे निष्पन्न झाले. ही कार ऋषी शुक्ला यांच्या मालकीची असल्याचे समोर आले. घटनेच्यावेळी कार त्यांचा मित्र धनंजय हरचंद महाजन (२५, जळगाव) चालवत असल्याची माहिती मिळाली. यावरून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या