Thursday, March 12, 2026
Homeआरोग्यसंत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी

संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी

संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी
जळगाव – खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                  संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी, सामान्य आरोग्य तपासणी तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. तज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून विद्यार्थ्यांना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, योग्य आहार व स्वच्छतेचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
हे शिबिर श्री चामुंडा माता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय तसेच श्री पी. ई. तात्या पाटील नेत्र रुग्णालय, चिंचोली (जळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. तपासणीदरम्यान ज्या विद्यार्थ्यांना नेत्रदोष किंवा चष्म्याचा नंबर आढळला, त्या विद्यार्थ्यांना डॉ. जयेश वाल्हे यांनी वैयक्तिक मार्गदर्शन केले. तसेच संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना व शिक्षकांनाही नेत्र व आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटपही करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तपासणीसाठी ने-आण करण्यासाठी महाविद्यालयाकडून बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांची नेत्र व आरोग्य तपासणी करून दिल्याबद्दल शाळेतर्फे संस्थेचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
या शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकांनी सहभाग घेतला. शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. या शिबिरात डॉ. नरेंद्र शर्मा, डॉ. सुरेश अग्रवाल, डॉ. अमिता श्रीवास्तव, डॉ. सिद्धेश्वर पाटील व डॉ. सोनाली मोरे यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या