खडका चौफुलीत भरधाव कारने दुचाकीला दिली धडक ; कार चालक फरार!


भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरातील खडका चौफुली परिसरात भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला असून या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडोल येथील सतिष प्रकाश धनगर (वय ३८) हे दि. १ एप्रिल रोजी मित्र आकाश माळी यांच्या दुचाकीने अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथे कार्यक्रमासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात सायंकाळी साडेचार वाजता खडका चौफुली येथील पूजा कॉम्प्लेक्सजवळ मागून येणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर धनगर हे दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला, गालावर, हात, पाठ व गुडघ्यांना गंभीर दुखापती झाल्या. स्थानिक नागरिक व दीपक काटकर यांनी तातडीने मदत करत त्यांना रुग्णवाहिकेद्वारे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. अपघातानंतर कार चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. संबंधित कार (क्र. एमएच १९ ईए २४९९) असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत धनगर यांचा मोबाईल फोनही हरवला आहे

