Monday, April 6, 2026
Homeआंदोलनविकासासाठी रस्त्यावर उतरले भुसावळकर; जनआक्रोश मोर्चा गाजला ! प्रशासनाचे लक्ष वेधले  विकासाला...

विकासासाठी रस्त्यावर उतरले भुसावळकर; जनआक्रोश मोर्चा गाजला ! प्रशासनाचे लक्ष वेधले  विकासाला अडथळे का ? भुसावळात जनआक्रोश मोर्चातून सवाल 

विकासासाठी रस्त्यावर उतरले भुसावळकर; जनआक्रोश मोर्चा गाजला ! प्रशासनाचे लक्ष वेधले
विकासाला अडथळे का ? भुसावळात जनआक्रोश मोर्चातून सवाल

भुसावळ    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी        दि 6
भुसावळ शहरातील विविध प्रलंबित विकासकामांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सकाळी १० वाजता “भुसावळ जनआक्रोश मोर्चा” काढण्यात आला. गांधी पुतळा, यावल नाका येथून प्रांत कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला असून प्रांत अधिकाऱ्यांचे प्रतिनिधीं नायक सहसिलदार संतोष विनंते यांना निवेदन सादर करण्यात आले.

 


“ना राजकारणासाठी, ना स्वार्थासाठी; हा लढा फक्त भुसावळच्या विकासासाठी” या भूमिकेतून मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. शहरातील स्मशानभूमी, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, दिव्यांग कल्याण, घरकुल योजना, स्वच्छता, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांबाबत वारंवार अडथळे येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
मोर्चाद्वारे २५ हून अधिक प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये स्मशानभूमी व कब्रस्तानातील सुविधा सुधारणा, मृतदेहासाठी शवपेटी उपलब्धता, स्मारकांची दुरुस्ती, संसर्गजन्य रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय, दिव्यांगांसाठी राखीव निधी, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुरी, पाणीपुरवठा सुधारणा, क्लोरीनेटर बसविणे, उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना, स्वच्छता अभियानांची अंमलबजावणी, तसेच रस्ते, सिग्नल आणि सार्वजनिक शौचालयांची उभारणी यांचा समावेश आहे.तसेच शहरातील डम्पिंग साईटचे आधुनिकीकरण, चौकांचे सुशोभीकरण, अल्पसंख्याक समाजासाठी सभागृह, कब्रस्तान दुरुस्ती, विविध भागांमध्ये बूस्टर पंप व पाइपलाइन टाकणे आदी मागण्या देखील करण्यात आल्या.

 

Oplus_131072

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे भुसावळ शहर अध्यक्ष,अजय दामु पाटील , जगन सोनवणे , उल्हास पगारे व दुर्गेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या मोर्चात नागरिक, युवक, महिला, व्यापारी, कामगार, अपंग व्यक्तीं ‘ तृतीय पंथीय नागरीक व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. मोर्चात गतीरोधक मंत्री यांनी राजीनामा द्यावा अश्या घोषणा करण्यात आल्या .

 

“भुसावळ शहरातील ५०० पेक्षा अधिक विकासकामांना विरोध का केला जात आहे?” असा सवाल उपस्थित करत, “विकासाला अडथळा आणणाऱ्यांना जनता उत्तर देईल,” असा इशारा आयोजकांनी दिला.
दरम्यान, मोर्चामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर काही काळ परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येण्याची शक्यता आहे. पुढील मोर्चा जिल्हा धिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे असे यावेळी सांगण्यात आले .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या