Saturday, June 14, 2025
Homeजळगावदूध उत्पादकांना प्रोत्साहनपर भाव जाहीर!

दूध उत्पादकांना प्रोत्साहनपर भाव जाहीर!

 अंबिका दूध उत्पादक सहकारी संस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न 

फैजपूर खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – फैजपूर येथील अंबिका दूध उत्पादक सहकारी संस्थेने दुधउत्पादकानां संस्थेने म्हैशीच्या दुधावर प्रतिलिटर साडेचार रुपये व गाईच्या दुधावर प्रतिलिटर साडेतीन रुपये प्रमाणे प्रोत्साहन भाव व सर्व दुधावर प्रतिलिटरवर साठ पैसे बोनस,१३ टक्के लाभांश,मिटिंग भत्ता दोनशे रुपये व दुधाच्या प्रमाणात बक्षीस देण्याचे संस्थेच्या दि २२ ऑगस्ट रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केले.
संस्थेने जाहीर केलेल्या रकमा दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा केल्याचे चेअरमन नितीन राणे यांनी सांगत.व जास्तीत जास्त दूध पुरवठा करण्याचे आवाहन केले.
फैजपूर येथील अंबिका दूध उत्पादक सहकारी संस्थेची २०२३-२०२४ या वर्षांच्या ४७ वी सर्वसाधारण सभेचे आयोजन दि २२ रोजी संस्थेच्या सभागृहात संस्थेचे चेअरमन नितीन भोजराज राणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.यावेळी विषय पत्रिकेवर १७ विषय घेण्यात आले.या सर्व विषयांवर चर्चा होऊन सभेत सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आली.संस्थेचे कार्य चांगले असल्याने प्रगतीपथावर आहे.दूध ग्राहकांचा विश्वास संपादन करणारी दूध उत्पादक संस्थेची सभासद संख्या ४१७ इतकी आहे.तर भागभांडवल ५ लाख २८ हजार २०० इतका व निव्वळ नफा ६ लाख ८३ हजार ५६९ इतका आहे.तसेच दूध उत्पादकांकडून प्रति दिन सातशे लिटर पर्यंत दुध पुरवठा होतो.या संस्थेने दूध उत्पादकांना बक्षिस वाटप करण्याची तरतूद केलेली आहे.सर्व दूध उत्पादकांना बक्षिस दिले जाते.त्याचप्रमाणे संस्थेकडून सभासदांच्या गुरांना मोफत लसीकरण दिले जाते.दरम्यान दूध उत्पादक यांच्या कडून मिळणाऱ्या सहकार्यामुळे या संस्थेकडून दूध उत्पादकांचे हित साधले जाते.दि २२ ऑगस्ट रोजी झालेल्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नफ्याच्या रकमेतून संस्थेने दूध उत्पादकांना बक्षिस वितरित केले.ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.सभेचे प्रास्ताविक चेअरमन नितीन राणे यांनी तर आभार कमलाकर भंगाळे यांनी मानले.दरम्यान २०२३-२०२४ या वर्षात म्हैस व गाय चा जास्त दूध पुरवठा करणारे पहिले दहा सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सभेला जेष्ठ संचालक भास्करराव चौधरी,माजी जिल्हा दूध संघ संचालक तथा संस्थेचे संचालक हेमराज चौधरी,व्हाईस चेअरमन जितेंद्र भारंबे,चंद्रशेखर चौधरी,मोहन वायकोळे,अजय महाजन,लक्ष्मण झांबरे,रमेश झोपे,विनोद चौधरी,उमाकांत भारंबे,अप्पा चौधरी,विजय पाटील,वंदना कोल्हे,जोत्स्ना भारंबे,सचिव सुनिल क्षत्रिय,येथील कामधेनू शीतकरण केंद्राचे व्यवस्थापक सचिन पाटील,दूध संकलन अधिकारी खेमचंद पाटील,दूध संघ कर्मचारी अमोल धांडे यांच्यासह सभासद उपस्थित होते.यशस्वी तेसाठी लिपिक कांचन अनिल राणे,सौ कल्पना विलास कोल्हे,विकास भारंबे,किशोर चौधरी,मंगु तडवी यांनी परिश्रम घेतले.

दूध उत्पादकांचे हित जोपासून संस्थेने जाहीर केल्याप्रमाणे भावफरक,बोनस,लाभांश,बक्षिस, मिटिंग भत्ता असे ३२ लाख संस्थेने दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा केले आहे.त्यामुळे दूध उत्पादक समाधानी आहे.

– नितीन राणे,चेअरमन अंबिका दूधउत्पादक सहकारी सोसायटी फैजपूर
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या