भुसावळात परशुराम जयंती उत्साहात साजरी; लेझीम पथकाने वेधले शहरवासीयांचे लक्ष !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरात दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त परशुराम भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. भगवान परशुराम जन्मोत्सव समिती 2026 तर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
शोभायात्रेची सुरुवात श्री भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले (कॅबिनेट मंत्री), ना. संजय सावकारे, सौ. रजनी सावकारे, भुसावळ शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. गायत्री भंगाळे, माजी आमदार संतोष चौधरी तसेच जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष वेदप्रकाश ओझा, उपाध्यक्ष रोहित कुलकर्णी, सचिव घनश्याम मिश्रा, आदित्य शर्मा, कोषाध्यक्ष देवेश कुलकर्णी आणि ब्राह्मण समाजातील ज्येष्ठ मान्यवर यांच्या हस्ते भगवान परशुरामांची आरती व माल्यार्पण करून करण्यात आली.

या शोभायात्रेत मलकापूर येथील श्रीराम ढोल पथक, सौ. अनघा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखालील महिला, मुली व मुलांचे ध्वज पथक, तसेच खड्ग पथक आणि परशु पथक हे विशेष आकर्षण ठरले.शोभायात्रेदरम्यान शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून भगवान परशुरामांचे पूजन केले. यामध्ये संतोष चौधरी, उद्योगपती मनोज बियाणी, नगरसेवक युवराज लोणारी, राजू आवटे, बबलू बऱ्हाटे, राहुल तायडे, मुकेश गुंजाळ, दीपक धांडे, परीक्षित ब्रहाटे, श्रेयस इंगळे आदींचा समावेश होता. सर्व मान्यवरांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
शोभायात्रेदरम्यान विविध ठिकाणी समाजबांधवांकडून सेवाकार्य करण्यात आले. गोपाल रेस्टॉरंटचे संचालक मयूर अग्रवाल व मितीश अग्रवाल यांनी सरबत वाटप केले. अग्रसेन चौकात ॲड. गोकुळ अग्रवाल व अग्रवाल समाजातर्फे पाणी व कुल्फी वाटप करण्यात आले. गुजराती स्वीटचे संचालक कपिल मेहता व सतीश खडायते यांनी शीतपेय वितरण करून भक्तांची सेवा केली.
शोभायात्रा अग्रसेन चौक, बसवेश्वर प्रतिमा व महाराणा प्रताप चौक मार्गे पुढे जात मुन्सिपल पार्क येथील राम मंदिरात समारोप झाली. येथे हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
या त्रिदिवसीय जन्मोत्सव सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी कैलास उपाध्याय, उमाकांत शर्मा, अनिरुद्ध कुलकर्णी, भूषण वैद्य, गौरव हिंगवे, भुषण जोशी, अनुप धावडे, प्रशांत उपासनी, धनंजय नाईक, तेजस जोशी, मंगेश भावे, जयप्रकाश शुक्ला, आशिष तिवारी, आनंद जोशी, खुशाल जोशी, संकेत कुलकर्णी, प्रशांत शर्मा, गोपाळ जोशी, दीपक पाथरकर गुरुजी, राधेश्याम दुबे, प्रविण मिश्रा, योगेंद्र दुबे, राजेश दुबे, अनिल कुमार तिवारी (लाला भैया), ए. के. तिवारी आदी पदाधिकारी व सदस्यांनी मागील महिनाभर अथक परिश्रम घेतले.

