Wednesday, May 6, 2026
Homeजळगावलोहारा एक्सप्रेस फिडरचा वीज पुरवठा सुरळीत करावा - फैजपूर नगरसेवकांची कार्यकारी अभियंता...

लोहारा एक्सप्रेस फिडरचा वीज पुरवठा सुरळीत करावा – फैजपूर नगरसेवकांची कार्यकारी अभियंता यांच्याकडे मागणी 

लोहारा एक्सप्रेस फिडरचा वीज पुरवठा सुरळीत करावा – फैजपूर नगरसेवकांची कार्यकारी अभियंता यांच्याकडे मागणी

 

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी

 

नगरपरिषदेचा पाणीपुरवठा हा लोहारा जॅकवेल वरून होत असतो आणि त्यासाठी विजेची लागणारी एक्सप्रेस फिडर लाईन ही गौरखेडा वीज उपकेंद्रातून दिली गेलेली आहे. परंतु या ठिकाणी दररोज होणारा वीज पुरवठा हा एक्सप्रेस फिडर लाईन असताना सुद्धा खंडित होत असल्यामुळे याचा परिणाम हा फैजपूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत असल्याकारणाने आज सर्व भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन याबाबत असलेल्या सर्व तक्रारी कार्यकारी अभियंता सावदा यांच्याकडे मांडून त्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

कोणतीही पूर्व सूचना न देता बऱ्याच वेळा वीज पुरवठा खंडित केला जातो, त्यासोबतच एखाद्या वेळेस सूचना दिलीच तर दोन तास पूर्व सूचना देऊन त्या पेक्षा जास्त वेळ वीज पुरवठा खंडित होतो आणि या सर्वांचा परिणाम शहर पाणीपुरवठ्यावर होत असल्याकारणाने या सर्व विषयाची तात्काळ दखल घेऊन सतत खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा. तसेच फैजपूर येथील फिल्टर प्लांटवर एक्सप्रेस फिडर लाईन असताना सुद्धा या ठिकाणी असेच प्रॉब्लेम सातत्याने येत आहे.

त्यासोबतच लोहारा जॅकवेल साठी असलेली एक्सप्रेस फिडर लाइन ही ज्या गौरखेडा सबस्टेशन मधून देण्यात आलेली आहे त्या एक्सप्रेस फिडर वरती बरेचसे अवैध वीज कनेक्शन असल्यामुळे हे संपूर्ण अवैध कनेक्शन काढण्यात यावे ही सुद्धा मागणी आज स्वतंत्र निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता सावदा श्री महाजन साहेब यांच्याकडे करण्यात आली.

यावेळी गटनेते सिद्धेश्वर वाघुळदे, उपनगराध्यक्ष निकिताताई कोळी, उपगटनेते सुरज गाजरे, नगरसेवक विनोद (पप्पू ) चौधरी, महेंद्र मंडवाले, सागर होले, राहुल गुजराथी, माजी उपनगराध्यक्ष हेमराज चौधरी, संदीप भारंबे ( गोटू भाऊ ), नरेंद्र चौधरी, जितेंद्र भारंबे, राजेश महाजन सर, अनंतभाऊ नेहेते यांच्यासह सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते. हे दोघं विषय तात्काळ मार्गी लागल्यास शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. याबाबत कार्यकारी अभियंता श्री महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिल्याचे गटनेते सिद्धेश्वर वाघूळदे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या