छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव ता . भुसावळ
, दि. १५ मे २०२६ : महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर – टप्पा क्रमांक १ अंतर्गत वरणगाव महसूल मंडळाचे शिबिर आज वरणगाव नगरपरिषद आवारात उत्साहात संपन्न झाले.
शिबिरास महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
यावेळी वरणगाव नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष . सुनील काळे, उपनगराध्यक्ष अरुणाताई इंगळे, भुसावळ उपविभागाचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तहसीलदार नीता लबडे यांनी प्रास्ताविक करत शिबिराच्या उद्देशाविषयी माहिती दिली. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती नागरिकांना दिली. तहसील कार्यालयाच्या नायब तहसीलदार श्रीमती पूजा अवघडे यांनी सामाजिक अर्थसहाय्य योजनांमधील बदलांविषयी मार्गदर्शन केले. श्रीमती प्रीती लुटे यांनी जनगणना २०२७ अंतर्गत पहिला टप्पा, घरगणना व स्वगणना याबाबत माहिती दिली. महिला व बालविकास अधिकारी श्रीमती रोझटकर यांनी एकल पाल्य योजना व वात्सल्य योजना याविषयी नागरिकांना मार्गदर्शन केले.
तहसीलदार नीता लबडे यांनी नागरिकांनी स्वगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून प्रगणकांना अचूक माहिती द्यावी तसेच प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्राम महसूल अधिकारी रेणुका पाटील यांनी केले.
कार्यक्रमात मंडळ अधिकारी रजनी तायडे व सुप्रिया बिराजदार यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.
शिबिरात वितरित करण्यात आले असून या शिबिरात ६५० गरजू नागरीक उपस्थीत होते . अनेकांना विविध दाखल्यांचा लाभ योजनांची माहिती कार्यक्रमाद्वारे मिळाली . या कार्यक्रमात मंत्री संजय सावकारे व नगराध्यक्ष सुनिल काळे प्रथमच एकाच व्यासपीठावर दिसल्याने गावात चर्चेला नविन विषय मिळाला आहे .

