वरणगाव खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – नगरपरिषदेच्या मालकीची असलेल्या जागेवरच्या हॉलचे उद्घाटन न.प , सार्वजनिक बांधकाम खात्याने का त्रयस्थांनी उद्घाटन करून घेतले चर्चेला उधाण
मंत्री गिरीष भाऊ महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सुध्दा डावलले
Oplus_131072
वरणगाव शहरातील गट नंबर 601 येथे ओपन जिम व जेष्ठ नागरिकांसाठी हॉल मंजूर केला होता सदर हॉलचा पाठपुरावा मंजुरी पासून लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केला होता मात्र काम अर्धवट असताना काल 17 मे रोजी सभागृहाचे उद्घाटन घाई घाई मध्ये राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार येथे यांच्या हस्ते घाईघाईत करण्यात आले सदर कोनशिलेवर अनावरण करताना फक्त मंत्री संजय सावकारे खासदार रक्षा खडसे यांचे नाव होते बाकी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे उपनगराध्यक्ष सौ अरुणा इंगळे व नगरसेवकांचे नाव त्या कोणशिलेवर नव्हते त्यामुळे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून प्रोटोकॉल प्रमाणे जर सन्मान होत नसेल तर यावर नाराजी व्यक्त करून त्या ठिकाणाहून नगराध्यक्षांनी काढता पाय घेतला तसेच हॉलची जागा ही नगरपरिषदेच्या मालकीची आहे हॉल सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधलेला आहे.
सदर उद्घाटन हे कोणत्या विभागामार्फत झालं सार्वजनिक बांधकाम विभाग का नगरपरिषद हा सुद्धा प्रश्न अनुत्तीर्ण असून का त्रयस्थ ठेकेदाराने दलालांनी हे भूमिपूजन मंत्र्यांच्या हस्ते करून घेतले इतर मंत्री गिरीष महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुद्धा नाव टाकले नाही तसेच उद्घाटनाचे कोणतेही अधिकृत निमंत्रण लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांना देण्यात आले न्हावते याची सुद्धा चौकशी झाली पाहिजेत सदर कोणत्याही शासकीय कार्यक्रम करताना स्थानिक आमदार खासदार आणि नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व लोकप्रतिनिधी म्हणून नाव टाकणे व अधिकृत निमंत्रण देणे प्रोटोकॉलनुसार बंधनकारक होते तरीही शासकीय प्रोटोकॉलचा भंग कोणी केला अशी चर्चा वरणगाव शहरात सुरू आहे प्रथम लोकनेते गोपीनाथ मुंडे हॉलच्या वेळेस सुद्धा लोकनियुक्त नगर अध्यक्ष सुनील काळे असताना उद्घाटनाच्या वेळेस त्यांना तिथे नाव डावले तसेच आता काल झालेल्या कार्यक्रमात सुद्धा सुनील काळेंचे नाव जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याने हा एक प्रकारे वरणगावच्या जनतेने निवडून दिलेल्या जनतेचा अपमान आहेया प्रकारांची तक्ररार लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केली आहे