Sunday, May 24, 2026
Homeजळगावफुलगाव ग्रामपंचायतीत राजकीय संघर्ष तीव्र; सरपंचांचा अविश्वास प्रस्तावावर गंभीर आरोप

फुलगाव ग्रामपंचायतीत राजकीय संघर्ष तीव्र; सरपंचांचा अविश्वास प्रस्तावावर गंभीर आरोप

फुलगाव ग्रामपंचायतीत राजकीय संघर्ष तीव्र; सरपंचांचा अविश्वास प्रस्तावावर गंभीर आरोप                  भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                  वरणगाव ता . भुसावळ

दि. २४ मे ग्रामपंचायत फुलगाव येथील लोकनियुक्त सरपंच शाम सुरेश फुलगांवकर यांनी आपल्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव हा ग्रामहितासाठी नसून राजकीय वैमनस्यातून रचलेले कारस्थान असल्याचा गंभीर आरोप पत्रकार परिषदेत केला केला आहे. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील उपस्थित होते .

त्यांनी सांगितले कि . सदस्य, उपसरपंच व त्यांच्या समर्थकांकडून गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायत कारभारात अडथळे निर्माण करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

सरपंच फुलगांवकर यांनी सांगितले की, अनेक मासिक सभांमध्ये काही सदस्य जाणीवपूर्वक गैरहजर राहिले तसेच मागील तीन महिन्यांपासून सभा तहकूब करण्याचे प्रकार घडवून आणले गेले. यामुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या बँक सही नमुन्यांमध्ये बदल होऊ शकला नाही आणि कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून प्रलंबित राहिले आहे.

याशिवाय ग्रामपंचायत प्रशासन अस्थिर करून स्वच्छता व नागरी सेवांवर परिणाम करण्यात आला असून त्याच परिस्थितीचा वापर करून सोशल मीडियावर बदनामी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ग्रामसभांमध्ये गोंधळ, शिवीगाळ, खुर्च्या फेकण्याचे प्रकार घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.

२९ ऑगस्ट २०२५ रोजीच्या सभेत काही सदस्य व उपसरपंच यांनी मारहाणीचा प्रयत्न केल्याचा आरोप करताना त्यांनी या संदर्भात ग्रामपंचायत अधिकारी यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे जीवितास धोका असल्याचे लेखी निवेदन दिल्याचे सांगितले. तसेच संबंधित सदस्यांविरोधात ग्रामसभेत शिस्तभंग कारवाईचा ठरावही मंजूर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फुलगाव ग्रामपंचायतीत मागील दोन वर्षांत तब्बल १३ ग्रामसेवक व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने प्रशासन अस्थिर झाल्याचा आरोप करताना, काही राजकीय विरोधक ग्रामविकास रोखून स्वतःची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सरपंचांनी म्हटले आहे.

सरपंचांनी पुढे सांगितले की, अविश्वास प्रस्तावावर सही करणाऱ्या काही सदस्यांना यापूर्वी थकबाकीदार म्हणून अपात्र घोषित करण्यात आले होते. तसेच नव्याने निवडून आलेल्या सदस्याने नियमित सभांमध्ये सहभाग न घेता थेट अविश्वास प्रस्तावावर सही केल्याने संपूर्ण प्रकार पूर्वनियोजित असल्याची शंका निर्माण होत आहे.

मानसिक दबाव, धमक्या, पोलिस मदत मागण्याची वेळ तसेच सदस्य व सदस्य पतींकडून धमक्या दिल्याबाबत स्थानिक पोलिस ठाण्यात नोंदी असल्याचेही त्यांनी सांगितले. संबंधितांविरोधात अनेक तक्रारी करूनही अद्याप प्रभावी चौकशी किंवा ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. दिड कोटीचा निधी पडून असून गावाचा विकास होत नाही . काही लोकांच्या आडमुठे धोरणामुळे हा प्रकार सुरू असून मला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे .

सध्या शिवसेनेत असुनही मला पाहीजे तेवढे सहकार्य मिळाले नाही आता तरी शिवसेनेने मला सहकार्य करून गावाचा विकास करावा तहसीलदार मॅडम यांना मी याबाबत सर्व प्रस्ताव सादर केले आहे त्यांनी निष्पक्ष पण न्याय द्यावा असेही त्यांनी सांगितले .

लोकनियुक्त सरपंच म्हणून थेट जनतेतून निवडून आलेल्या प्रतिनिधी विरोधात काही सदस्य जनतेच्या जनादेशालाच आव्हान देत आहेत,” असे सांगत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष दखल घेऊन वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी विनंती सरपंच शाम सुरेश फुलगांवकर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या