Tuesday, April 21, 2026
Homeजळगावलक्ष्मी व्यंकटेश मंदिरात श्री कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी

लक्ष्मी व्यंकटेश मंदिरात श्री कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी

अखिल भारतीय मारवाडी महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन

भुसावळ खानदेश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ येथील अखिल भारतीय मारवाडी महिला मंडळाच्या वतीने २७ रोजी लक्ष्मी व्यंकटेश मंदिरात श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी झुला सजवण्यात आला. यासोबतच श्रीकृष्ण जन्माष्टमी भगवान श्रीकृष्णाचे सुमधुर भजन गाऊन व सुंदर झांकी सादर करून मोठ्या आनंदात श्री कृष्ण जन्माष्टमी
साजरी करण्यात आली. राधाकृष्ण आणि गोपींचा आणि आरतीचा प्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली, आम्ही दरवर्षी श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिरात झुला सजवून जन्माष्टमी साजरी करतो असे मंडळाच्या अध्यक्षा बीना अग्रवाल यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी मंडळ सचिव वीणा जैन, मंडळाच्या कोषाध्यक्षा निकिता अग्रवाल, मंडळाच्या कार्याध्यक्षा. जयश्री भराडीया मंडळ उपाध्यक्षा नीलम जैन, सहकोषाध्यक्षा कामिनी जैन, उपाध्यक्षा सुनीता चांडक, सहसंघटन मंत्री रेखा व्यास, तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव भारती राठी माळी अध्यक्षा वर्षा जैन, हेमा बेहेरा सज्जन टाक काकीजी, शांता टाक, कांता शर्मा, रेखा अग्रवाल, कृष्णा अग्रवाल, सुधा अग्रवाल, पूनम अग्रवाल, नेहा मंत्री, विजया अग्रवाल, दीप्ती अग्रवाल, पुष्पा अग्रवाल, मोनिका अग्रवाल, संगीता सुनील अग्रवाल, मंजू अग्रवाल, प्रिया अग्रवाल, मीना शर्मा, वंशिका अग्रवाल, शशिकला लाहोटी. , नीता चोरडिया , दुर्गा प्रजापती , सुचित्रा अग्रवाल , नेहा अग्रवाल यांनी परिश्रम घेतले उपस्थितांचे आभार वीणा जैन यांनी मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या