महिलांना रोजगारासाठी महिला आघाडीने दिले खासदार श्रीकांत शिंदे यांना निवेदन दिले

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ येथील महिला आघाडीच्या वतीने तालुकाप्रमुख वर्षा स्वामी तल्लारे व इतर महिला कार्यकर्त्यांनी माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्यासमोर एक ठोस निवेदन सादर केले. निवेदनात जळगाव जिल्हा व भुसावळ तालुक्यातील गरजू व दारिद्ररेषेखालील मागासवर्गीय महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन महिला उद्योजकत्वास प्रोत्साहन देण्याची आणि महिलांवर होणाऱ्या अन्यायाचे त्वरीत निवारण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनातील मुख्य मागण्या ‘
गरजू व दारिद्ररेषेखालील मागासवर्गीय महिलांसाठी विशेष रोजगार आणि कौशल्यविकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे.
महिला उद्योजकांना सुरुवातीचे भांडवल, प्रशिक्षण आणि बाजारपेठेतील संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यस्तरीय पुढाकार.

महिलांविरुद्ध घडणाऱ्या अत्याचार आणि अन्यायाची त्वरित चौकशी; आरोपींना वेगाची शिक्षा आणि पीडित महिलांना न्याय व पुनर्वसन.
स्थानिक कल्याणकारी योजनांत महिलांना आणि विशेषतः मागासवर्गीय महिलांना प्राधान्य देणे या आहेत .
निवेदनावर नंदा निकम ,जळगाव जिल्हा प्रमुख: सरिता कोल्हे माळी ,
तालुका प्रमुख वर्षा स्वामी तल्लारे ,
सविता माळी, मनीषा पाटील, रिता भंगाळे, पुष्पा शिरसाट, सरिता कोळी, लक्ष्मी मेढे, पूजा पाटील, स्वाती भंगाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

