Saturday, June 13, 2026
Homeजळगावहनुमान व्यायाम शाळेस भारत शासनमान्य खेळ केंद्र (SAI) मिळणे साठी केंद्रीय राज्य...

हनुमान व्यायाम शाळेस भारत शासनमान्य खेळ केंद्र (SAI) मिळणे साठी केंद्रीय राज्य खेळमंत्री रक्षाताई खडसे यांचेकडे निवेदन सादर.

हनुमान व्यायाम शाळेस भारत शासनमान्य खेळ केंद्र (SAI) मिळणे साठी केंद्रीय राज्य खेळमंत्री रक्षाताई खडसे यांचेकडे निवेदन सादर.

वरणगाव   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                    येथील हनुमान व्यायाम शाळेमध्ये भारत शासनमान्य खेळ केंद्र (SAI) साई तसेच खेलो इंडिया अंतर्गत कुस्ती खेळासाठी प्रशिक्षण केंद्र मिळावे म्हणून वरणगाव येथील हनुमान व्यायाम शाळा व शहरातील समस्त क्रिडाप्रेमी नागरिक यांच्या वतीने केंद्रीय राज्य क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांचेकडे निवेदन सादर करण्यात आले.

वरणगाव हे पन्नास हजार लोकसंख्या वस्तीचे गाव असून आजूबाजूला 28 खेडे लागू आहेत. या खेड्यातील जवळजवळ 200 च्या आसपास व्यायाम पटू हनुमान व्यायाम शाळेमध्ये कुस्ती खेळाचा सराव करण्यासाठी दररोज येत असतात. तसेच हनुमान व्यायाम शाळेतील मल्लांनी आजपर्यंत महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धेमध्ये पर्यंत मजल मारली असून ऑल इंडिया आयुध निर्माण फॅक्टरी चॅम्पियनशिप मधे येथिल कुस्तीपटुंनी प्रथम क्रमांक मिळविलेला आहे. तसेच येथील बरेच मल्ल देशाच्या संरक्षण विभागा सह पोलीस खाते व इतर विविध खात्यांमध्ये नोकरीस आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया हा उपक्रम देशातून उत्कृष्ट खेळाडू निर्मिती होण्यासाठी सुरू केलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय राज्य क्रीडामंत्री रक्षाताई खडसे यांचा जिल्ह्यातून उत्कृष्ट खेळाडू तयार व्हावे यासाठी ठिकठिकाणी भारत सरकार शासनमान्य ( साई )क्रीडा केंद्र निर्मिती करण्याचा मनोदय आहे. व त्याबाबत जिल्हा क्रीडा कार्यालयामध्ये सुद्धा बैठक पार पडलेली आहे. हनुमान व्यायाम शाळेचा सम्पूर्ण इतिहास व सुविधा पाहता येथे सदरचे केंद्र मिळावे म्हणून व्यायाम शाळेसह शारातील क्रिडाप्रेमी नागरिकांच्या वतीने केंद्रीय राज्य क्रीडामंत्री रक्षाताई खडसे यांना नुकतेच निवेदन दि .९ जुन रोजी निवेदन देण्यात आले. त्यावेळी प्राध्यापक भागवत निकम , नरेंद्र माळी,इफ्तेखार मिर्झा, बाळासाहेब चव्हाण ,संजय बावस्कर ,यांचे सह क्रिडाप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या