Wednesday, June 10, 2026
Homeजळगावफैजपूरमध्ये गायीला राष्ट्रीय गौ माता घोषित करण्याची मागणी; कामगार संघटना तथा मुस्लिम...

फैजपूरमध्ये गायीला राष्ट्रीय गौ माता घोषित करण्याची मागणी; कामगार संघटना तथा मुस्लिम समाजाचे प्रांतांना निवेदन !

फैजपूरमध्ये गायीला राष्ट्रीय गौ माता घोषित करण्याची मागणी; कामगार संघटना तथा मुस्लिम समाजाचे प्रांतांना निवेदन !

फैजपूर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – फैजपूर शहरात आज कामगार संघटना व मुस्लिम समाजाच्या वतीने एक महत्त्वाचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.

या निवेदनाद्वारे त्यांनी केंद्रव राज्य सरकारकडे गायीला ‘ राष्ट्रीय गौ माता ‘ म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी मुस्लिम समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही मागणी लावून धरली. गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा मिळावा, यासाठी प्रशासनाकडे अधिकृत निवेदन सोपवण्यात आले. यावेळी श्रमिक कोहेनूर कामगार संघटनेचे अध्यक्ष शाकीर मलिक यांनी सांगितले की, पुरातन काळापासून गायीला भारतभर हिंदू सनातन धर्मात मोठा मान व सन्मान असून गाईला माता मानले जाते. तसेच गाईचे दूध अमृता समान आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने गाईला तात्काळ राष्ट्रीय गौ माता म्हणून घोषित करावे अशी मागणी केली. यावेळी कामगार संघटना पदाधिकारी यूनुस बाबूलाल पिंजारी, आसिफ कमरुद्दीन, इरफान शेख, मोहसीन मिस्तरी, लुकमान शेख, अब्दुल कादिर, अल्ताफ शेख, जफर अली, तौसीफ खान, शाकिर शेख यांसह असंख्य कामगार, मुस्लिम युवा प्रांत कार्यालयात उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या