Wednesday, September 16, 2026
Homeजळगावकोरपावली येथील घरकुल इंजिनिअरची बदली करा : प्रशासक विलास अडकमोल.

कोरपावली येथील घरकुल इंजिनिअरची बदली करा : प्रशासक विलास अडकमोल.

कोरपावली येथील घरकुल इंजिनिअरची बदली करा : प्रशासक विलास अडकमोल.

यावल खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – तालुक्यातील कोरपावली येथील घरकुल इंजिनियर हर्षल चौधरी हे घरकुल लाभार्थ्यांकडून जोपर्यंत आर्थिक लाभ होत नाही तोपर्यंत त्यांचे जिओ टॅगिंगचे फोटो काढत नाही. म्हणून त्यांची बदली करावी अशी मागणी कोरपावली ग्रामपंचायत प्रशासक विलास अडकमोल यांनी केली.

यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की कोरपावली येथील घरकुल इंजिनियर हर्षल चौधरी हे घरकुल लाभार्थ्याकडून आर्थिक लाभ मिळण्यासाठी तथा जिओ टॅगिंग फोटो काढण्यासाठी जाणून बुजून खूप विलंब लावतात त्यासाठी कोरपावली माजी सरपंच तथा प्रशासक विलास नारायण अडकमोल यांनी त्यांची बदली करा अशी मागणी केली आहे त्यांच्या या अर्जाकडे यावल पंचायत समिती नव्याने आलेले सहाय्यक गटविकास अधिकारी काय कार्यवाही करतात.? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या