मा.ना.गिरीश महाजन यांची सोशल मीडियावर प्रतिमा मलीन करणाऱ्या विरुद्ध तात्काळ कारवाईची मागणी केली आमदार अमोलदादा जावळे यांनी.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२०
मा.ना.गिरीश महाजन यांच्या विरुद्ध सोशल मीडियावर, फेसबुक,इंस्टाग्राम,ट्विटर, व्हाट्सअपवर आशेपाह फोटो व कमेंट करून प्रतिमा मलीन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार अमोलदादा जावळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली.
आमदार अमोलदादा जावळे,सागर नामदेवराव कोळी,भाजपा तालुकाध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते निवेदनावर स्वाक्षरी करणारे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की आहे की, फेसबुक / इन्स्टाग्राम / Twitter/Whatsapp या सर्व सोशल साईटवर हेतु पुरस्करपणे मा.ना.
गिरीशभाऊ महाजन यांच्या विरोधात आक्षेपार्ह फोटो व्हायरल करुन प्रसारीत केले आहे.
सदर कृतीमुळे जनमानसात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला असुन समाजात असंतोष व द्वेष
पसरवण्याचे कटकारस्थान करण्यात आलेले आहे.राजकीय नेत्यांची प्रतिमा मलिन करून त्यांच्या सामाजिक, राजकीय व सार्वजनिक जीवनावर प्रश्नचिन्ह निर्माण करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.म्हणून आपण सदर व्यक्तींविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करावा व चौकशी करून संबंधित सर्व सोशल मीडियावरील फोटो त्वरित हटवण्यात यावेत तसेच भविष्यात अशा प्रकारच्या खोट्या व दिशाभूल करणाऱ्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी.
दिलेल्या निवेदनावर आमदार अमोलदादा जावळे, नगरपरिषद गटनेत्या सौ.नंदा महाजन, नगरसेवक उमेश फेगडे, हेमराज फेगडे,योगेश चौधरी,सौ.सविता नन्नवरे,सौ.कल्पना वाणी, डॉ. कुंदन फेगडे,राकेश कोलते, भरत पाटील,ज्ञानेश्वर तायडे,डॉ.निलेश गडे,भूषण फेगडे,दिलीप वाणी, संदीप सोनवणे,विलास चौधरी, रितेश बारी,उज्वल कानडे,मुकेश कोळी,बबलू घारू,विकी सोनवणे, कोमल इंगळे,व्यंकटेश बारी इत्यादी पदाधिकारी कार्यकर्त्यांची स्वाक्षरी आहे.

