नगरपरिषद मालकीच्या जुन्या विहिरी तात्काळ सुरू केल्यास पाणीटंचाईचा प्रश्न मिटणार : नगरसेवक सागर चौधरी!

यावल खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – यावल शहरातील पाणीटंचाई लक्षात घेता जुन्या विहिरी तात्काळ सुरू करण्याबाबत शिवसेना उबाठाचे नगरसेवक सुनील चौधरी,सौ.वैशाली बारी यांनी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.यावल शहराला दरवर्षी हतनूर धरण पाटाच्या माध्यमातून / आवर्तनातून पाणीपुरवठा केला जातो.मात्र यावर्षी वाढत्या तापमानामुळे तसेच मान्सून लांबल्याने गंभीर पाणीटंचाईमुळे हतनूर धरणातून आवर्तन सोडण्यात येत नसल्याने शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
म्हणून यावल शहरात पूर्वी यावल नगरपालिका तर्फे वापरात असलेल्या अनेक जुन्या विहिरी आजही अस्तित्वात आहेत.या विहिरींची साफसफाई,दुरुस्ती व आवश्यक यंत्रणा बसवून त्या पुन्हा कार्यान्वित केल्यास शहरातील पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होऊ शकते.त्यामुळे नागरिकांना नियमित व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल.तरी नगरपरिषदेने यावल शहरातील सर्व जुन्या विहिरींचे तात्काळ सर्वेक्षण करून त्यांचीदुरुस्ती,वीजपुरवठा,विहिरीची स्वच्छता व पाणी उपसा यंत्रणा सुरू करण्यासाठी आवश्यक ती पर्यायी व्यवस्था तात्काळ करून जनहित साध्य करून पाणीपुरवठा व्यवस्थित सुरळीत करावा अशी मागणी सागर चौधरी नगरसेवक गटनेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष…….. सौ.वैशाली निलेश बारी नगरसेवक यांनी केली आहे.

