जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये योग दिनानिमित्त योग शिबिर संपन्न.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२१
आज रविवार दि.२१ जून रोजी यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूलमध्ये योग दिनानिमित्त योग शिबिर घेण्यात आले.
योग शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी उत्तुंग असा सहभाग दाखवला या योग्य शिबिराला शाळेच्या प्राचार्या सौ.रंजना महाजन मॅडम व इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्या श्रीमत दिपाली धांडे मॅडम यांनी उपस्थिती देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री लोखंडे मॅडम व आणि सौ. गौरी भिरूड मॅडम यांनी शिबिराला सहकार्य केले.शाळेच्या शिक्षिका सौ.प्रीती भार्गव मॅडम आणि सौ. माधुरी भारंबे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना योग दिना बद्दल माहिती व योग प्राणायाम करण्याचे फायदे सांगितले.नंतर शिक्षिका सौ.अर्चना पाटील मॅडम आणि हर्षाली भारी मॅडम यांनी विद्यार्थ्यांकडून ध्यान योग ताडासन,वृक्षासन,/अर्धचक्रासन, त्रिकोणासन/भद्रासन, बालासन, भुजंगासन इत्यादी योगासनाचे प्रकार करवून घेतले .
तसेच अनुलोम-विलोम कपाल भारती भ्रामरी इत्यादी प्राणायाम केले या योग शिबिराला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभले अशा प्रकारे जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

