यावल शहरातील सुरू असलेली अनधिकृत मांस विक्री बंद करण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष राकेश सोनार मागणी.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.३०
शहरात बोरावल गेट भागात अनधिकृत बेकायदा मास विक्री सुरू असल्याने यावल नगर परिषदेने तात्काळ बंद करावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रावेत लोकसभा अध्यक्ष राकेश सोनार करण्यात आली.
यावल शहरातील बोरावल गेट भागात शाळा आणि महापुरुषांच्या स्मारकांसमोर सुरू असलेल्या उघड्यावरील मांस विक्रीमुळे समाजात गंभीर,चिंताजनक समस्या निर्माण झाल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने यावल नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,बोरावल गेट परिसरात मराठी मुलींच्या शाळेच्या अगदी बाजूला मोठ्या प्रमाणात चिकन,मटण आणि इतर मांसाची दुकाने उघड्यावर, अस्वच्छ जागेवर सुरू आहेत. उघड्यावर सुरू असलेल्या या विक्रीमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून,याचा नाहक त्रास शाळेतील विद्यार्थी,शिक्षक, स्थानिक व्यापारी,नागरिकांना सहन करावा लागत आहे.
नगरपरिषदेने मांस विक्रेत्यांसाठी स्वतंत्र मार्केटची जागा उपलब्ध करून दिली असतानाही,बोरावल गेट परिसरात ही अनधिकृत विक्री राजरोसपणे सुरू आहे.विशेष म्हणजे,याच परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आणि बोधिसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पवित्र स्मारके आहेत.स्मारकांच्या अगदी समोर अशा प्रकारे उघड्यावर मांस विक्री होणे अत्यंत निंदनीय असून यामुळे नागरिकांच्या तसेच शिव-भिम अनुयायांच्या भावना दुखावल्या जात आहेत.
याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत प्रशासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घ्यावी,अशी मागणी केली आहे. बोरावल गेट परिसरातील ही अनधिकृत व उघड्यावरील मांस विक्री त्वरित बंद करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आणि या विक्रेत्यांना नगरपरिषदेने निश्चित केलेल्या अधिकृत जागेवर स्थलांतरित करावे जेणेकरून परिसरातील स्वच्छता व पवित्रता राखली जाईल अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रशासनाने यावर तातडीने सकारात्मक कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

