विकास गोल्ड दुधाच्या प्रत्येक थैलीमागे ग्राहकांची दोन रुपयांची लूट.
वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथे काही ठिकाणी विकास गोल्ड दुधाची एजन्सी देण्यात आली आहे , पैकी येथील जय जवान बेकरी च्या दुकानावर विकास गोल्ड दुधाच्या प्रत्येक थैली मागे दोन रुपये अधिकचे घेऊन ग्राहकांची सर्रास लूट सुरू आहे.
याबाबत प्रत्यक्ष दुकानावर संपर्क साधला असताना बाळासाहेब चव्हाण या ग्राहकांस ३८ रुपयाची दुधाची थैली चाळीस रुपयाला देण्यात आली व घ्यायचे असेल तर घ्या असं बजावण्यात आलं .या आधी सुद्धा बऱ्याच ग्राहकांच्या दूध थैली मागे दोन रुपये अधिक घेण्याचा तक्रारी आल्या असून वरणगाव मध्ये ग्राहकांची एक प्रकारे सर्रास लूट सुरू आहे. याबाबत बेकरी संचालकांना विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितले आमच्या थैल्यांमध्ये बऱ्याच थैल्या या लिकेज असतात. त्याबाबत आम्ही दूध संघाकडे तक्रार केली असता आम्हाला समाधानकारक उत्तर दिले जात नाही त्यामुळे आम्ही दुधाच्या प्रत्येक थैली मागे दोन रुपये अधिक घेत आहोत. परंतु थैलीवर प्रत्यक्ष ३८ रु . किंमत असतांना ४०रू घेणे कितपत योग्य आहे ? ग्राहकांना याचा भुर्दंड कां ? असे प्रश्न उपस्थित केले जात असून याबाबत संबंधितांनी योग्य चौकशी करून ग्राहकांची लूट थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.


