नेपाळ दुर्घटनेतील दोन जखमींना मुंबईला आणले
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – नेपाळ दुर्घटनेतील दोन जखमींना मुंबईत आणले असल्याचे माहिती काठमांडू हुन प्रशांत पाटील यांनी दिली आहे .या जखमींमध्ये अनंत ओंकार इंगळे व सीमा अनंत इंगळे राहणार तळवेल यांचा समावेश आहे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना विमानाने मुंबई येथे पाठवण्यात आले आहे मुंबईत उपचार पुढील केल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात येणार आहे.जशी जशी प्रकृतीत सुधारणा होत आहे तसे जखमी मुंबईत आणले जात आहे. मुंबईत ना .गिरिष महाजन व आमदार संजय सावकारे डॉक्टरांच्या संपर्कात आहेत .


