यावल शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा.
नगरसेविका – सौ.कल्पना वाणी.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१७
यावल शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढल्याने तत्काळ उपाय योजना /बंदोबस्त करण्याची मागणी यावल नगरपरिषद सदस्य सौ.कल्पना वाणी यांनी केली.
नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे दि.१६ जुलै २०२६ रोजी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे की
यावल शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना मोठ्या
प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.अनेक ठिकाणी कुत्र्यांचे कळप रस्त्यावर फिरत असल्यामुळे लहान मुले,
महिला,ज्येष्ठ नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुत्रे चावण्याच्या घटना वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी आणि मानवीय मार्गाने उपाय करण्यासाठी यावल नगर परिषदेमार्फत ABC ( Animal
Birth Control ) सेंटर तातडीने सुरू करण्यात यावे.या केंद्रामार्फत भटक्या कुत्र्यांची नसबंदी (Sterilization), रेबीज प्रतिबंधक लसीकरण ( Anti-RabiesVaccinatio)
तसेच नियमानुसार त्यांचे व्यवस्थापन करण्यात यावे. यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात राहून नागरिकांच्या सुरक्षिततेस मोठी मदत होईल.
तरी आपल्या स्तरावर या मागणीची तातडीने दखल घेऊन यावल शहरात ABC सेंटर सुरू करण्याबाबत आवश्यक ती
कार्यवाही करावी हे दिलेल्या निवेदनात नगरपालिका सदस्यां सौ. कल्पना वाणी यांनी नमूद केले आहे

