वरणगाव येथे अप्पर तहसील कार्यालयासाठी महसूल मंत्री यांचेकडे निवेदन सादर .
प्रस्ताव तातडीने पाठवण्याची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी हे ब्रिटिश काळात कचेरी असलेले तालुक्याचे गाव होते येथिल बाजार पेठ मोठी असून खेडयापाड्यातून येथे येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे . सर्वांना महसुली ची कामे करण्यासाठी खुप फेरा पडतो त्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थीतीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नगराध्यक्ष सुनील काळे यांनी भेट घेवून येथे अप्पर तहसील कार्यालय व्हावे या मागणीचे निवेदन दिले .
भुसावळ शहरा नंतर वरणगाव हे सर्वाधिक म्हणजे साठ हजार लोकसंख्येचे मोठे शहर असून अठ्ठावीस खेडे शहराला लागून आहेत इंग्रज काळात वरणगाव तालुका होता याबाबत सर्व पुरावे सादर करून त्याबाबतचे महत्व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पटवून दिले जिल्ह्यात वरणगाव पेक्षा कमी असलेल्या गावांना अप्पर तहसील कार्यालय मंजूर आहे आणि आमच्या वरणगाव वर अन्याय कां? असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला त्यावेळी लागलीच महसुल मंत्री यांनी जळगाव जिल्हाधिकारी डॉ रोहन घुगे यांना स्वतःच्या मोबाईल वरून संवाद साधत वरणगाव ला अप्पर तहसील कार्यालय चा प्रस्ताव तातडीने पाठवण्याची सूचना केली . सदरच्या अप्पर तहसील कार्यालयासाठी जुनी नगर परिषदेची जागा सुध्दा उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले . त्यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मंत्री गिरीष महाजन तसेच मंत्री संजय सावकारे यांची भेट घेवून वस्तुस्थिती पटवून दिली या वेळी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या सोबत नगरसेवक नाना चौधरी अजमल खान फजल शेख शामराव धनगर शहराध्यक्ष सुनील माळी आकाश निमकर उपस्थित होते.

