Thursday, July 23, 2026
Homeजळगावजयंतीउत्सवानिमित्त भुसावळला छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर

जयंतीउत्सवानिमित्त भुसावळला छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर

जयंतीउत्सवानिमित्त भुसावळला छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर

भुसावळ नगर परिषदेच्यावतीने आयोजन

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी         मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रथम जयंतीचे औचित्य साधून भुसावळ विधानसभा मतदार संघात छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे 22 जुलै रोजी संतोषी माता हॉल मातृभूमी चौक येथे भुसावळ नगर परिषदेच्या प्रभारी नगराध्यक्ष श्रीमती शैलजा नारखेडे यांचे अध्यक्षतेखाली, श्रीमंत हारकर अप्पर जिल्हाधिकारी , केदार बारबोले उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीमती रजनी सावकारे , प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील , तहसीलदार निता लबडे, नायब तहसीलदार प्रिती लुटे आणि अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

Oplus_131072

शिबिरामध्ये महसूल विभाग, पंचायत समिती विभाग, कृषी विभाग आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, भारतीय डाक विभाग ,पशुसंवर्धन विभाग, नगरपरिषद भुसावळ, नगरपालिका वरणगाव , लीड बँक पोलीस खात्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शिबिरात 7485 लाभार्थ्यांना लाभ मंजूर करण्यात आला तसेच प्राथमिक स्वरूपात 187 लाभार्थ्यांना लाभ वाटपाचे मंजुरी प्रमाणपत्र देण्यात आले. यात विविध विभागातर्फे देण्यात आलेले लाभ महसूल विभाग:4639, कृषी व पशुसंवर्धन विभाग:943 पंचायत समिती

 

Oplus_131072

विभाग:534 एकात्मिक बालविकास विभाग:1334, आरोग्य विभाग:35, तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी विविध शासकीय विभागाच्या स्टालवर योजनांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी,अर्ज आणि लाभाचे स्वरूप याबाबत सखोल माहिती लाभार्थ्यांना देण्यात आली. त्याचप्रमाणे संबंधित ठिकाणी वैद्यकीय पथक तसेच आवश्यक पोलीस बंदोबस्त देखील होता. प्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते. अलीकडच्या काही दिवसांमध्ये नवीन शासकीय निर्णय घेण्यात आले असून, अनेक सुविधा शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनतेसाठी देण्यात आल्या आहेत. शिबिराला साधारणतः 5230 लाभार्थी, शेतकरी, विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या