Thursday, July 23, 2026
Homeआंदोलनविद्यार्थ्यांवरील कथित पोलीस कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीतर्फे चाळीसगाव बंद

विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीतर्फे चाळीसगाव बंद

विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीतर्फे चाळीसगाव बंद
चाळीसगाव :  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी        दिल्ली येथील जंतर-मंतर परिसरात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस कारवाईच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या लोकशाही अधिकारांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २३ जुलै रोजी चाळीसगाव तालुका बंद आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जनजागृती करून त्यानंतर शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करण्यात आले.आंदोलनापूर्वी संबंधित प्रशासनाला पूर्वसूचना देण्यात आली होती. भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य व शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकाराचा वापर करून हे आंदोलन करण्यात आल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगण्यात आले.आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये तसेच वाहतूक व सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, याची विशेष दक्षता घेण्यात आली. कार्यकर्त्यांनी संयम राखत कायद्याचे पालन करून आंदोलन शांततेत पार पाडले.या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संदीप (अण्णा) कांबळे, शहराध्यक्ष सागरजी भाऊ निकम, तालुका उपाध्यक्ष विकास बागुल, चेतन पवार, मनोज देशमुख, उपाध्यक्ष शाहिद शेख, महासचिव गौतम निकम, हंसराज पगारे, मांगू बागुल, विकास भालेराव, जीवन जाधव, अविनाश वाघ, आबा निकम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.दरम्यान, शांततापूर्ण आंदोलनास सहकार्य करणारे प्रशासन, पोलीस विभाग, नागरिक तसेच सर्व कार्यकर्त्यांचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आभार मानण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या