वृक्ष दिंडीने केली आषाढी एकादशी साजरा.


यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२५ आज दिनांक २५ जुलै २०२६ रोजी असलेली आषाढी एकादशी वृक्षदिंडी काढून यावल शहरातील तरुणांनी,महिलांनी साजरी केली.
वृक्ष वली आम्हा सोयरे वनचरे आषाढी एकादशी संतांच्या या शिकवणीवर साजरी करण्यात आली.शहरातील बोरावल शेळगाव रस्त्यावर १०८ झाडे लागवडीचा व संगोपनाचा संकल्प तरुणांनी घेतलेला आहे.त्यात आंबा,चिंच,जांभूळ , नीम,वड,पिंपळ,बेल,गुलमोहर इत्यादी झाडांच्या वृक्षारोपण करण्यात आले.
मोठ्या प्रमाणात झाडाची झालेली कत्तल यामुळे वाढत असलेले तापमान,कमी पातळीवर प्रमाणात होणारा पाऊस या गोष्टींना सामोरे जावं लागत आहे.या सर्व बाबींचा विचार करत यावल शहरातील तरुणांनी पुढाकार घेत झाड लागवडीचा व संगोपनाचा कौतुकास्पद संकल्प केला आहे आहे.त्यात प्रामुख्याने अध्यात्मिक किर्तन प्रवचन माध्यमातून जनजागृती करणारे संचित कोळी महाराज,दुर्गेश कोळी,यश वारके,खुशाल सपकाळे,पंकज चौधरी,लकी चौधरी,कृष्णा पाटील,कृष्णा कोलते,रुपेश कोल्हे,अभिषेक सोनवणे,अभिषेक महाजन,
धीरज व आयुष हे होते.त्यात ५० ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी महत्त्वाच्या वृक्षारोपाची मदत रमाबाई बडगुजर व कलाबाई चौधरी यांनी केली.निसर्गाची निगा राखणं सुद्धा एक प्रकारची देवाची पूजा नामस्मरण करणे काम आहे हे त्यांनी दाखवून दिलं.

