Wednesday, September 16, 2026
Homeगुन्हापोलिसांनी चारचाकीसह ५.१७ लाखांचा गुटखा केला जप्त;

पोलिसांनी चारचाकीसह ५.१७ लाखांचा गुटखा केला जप्त;

पोलिसांनी चारचाकीसह ५.१७ लाखांचा गुटखा केला जप्त;

वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             वरणगाव, ता. २५ : महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटखा व सुगंधित पानमसाल्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर वरणगाव पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा दणका दिला आहे. नॅशनल हायवे क्र. ५३ वर रचलेल्या सापळ्यात ५ लाख १७ हजार ८६८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर गुटखा माफियांचे धाबे दणाणले असून वरणगाव परिसरातून गुटखा पूर्णपणे हद्दपार करण्याची तीव्र मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे.

नॅशनल हायवे क्र. ५३ वर पोलिसांचा धाडसी सापळा
​जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या सूचनेनुसार वरणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल हे गुप्त बातमीदारांमार्फत माहिती संकलित केली त्या अनुशंगाने शुक्रवार ( ता.२४ ) श्री. बागुल यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, मुक्ताईनगर ते भुसावळ जाणाऱ्या नॅशनल हायवे क्र. ५३ वर कपीलवास्तू नगर जवळ काही जण गुटखा व पानमसाला विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्याच माहितीची शहानिशा करून पोलीस पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने संबधीत स्थळी सापळा रचला व संशयित सिल्व्हर रंगाची इनोव्हा कारला थांबस्त (क्र. एमएच -२०बीडी -३०००) ताब्यात घेतली.
​एक आरोपी जाळ्यात; गुन्हा दाखल
​गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा, सुगंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू आढळून आली. पोलिसांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करून पंचनामा पूर्ण केला.
​अटक करण्यात आलेला आरोपी:
चेतन लक्ष्मण नारखेडे (वय २८ वर्ष, रा. खालची आळी, नशिराबाद, जि. जळगाव).
​जप्त केलेला मुद्देमाल: बंदी असलेला गुटखा, सुगंधित पानमसाला, तंबाखू आणि वाहतुकीसाठी वापरलेली इनोव्हा कार, असा एकूण रु. ५,१७,८६८/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्न प्रशासन विभागाच्या तक्रारीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात
विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
​वरणगाव परिसरातून गुटखा हद्दपार करण्याची मागणी
​वरणगाव पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांनी कौतुक केले आहे. मात्र, परिसरात छुप्या मार्गाने विक्री होणाऱ्या गुटख्यामुळे युवा पिढी उद्ध्वस्त होत असल्याने, अशा अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी चाप लावून वरणगावातून गुटखा पूर्णपणे हद्दपार करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक वरणगावकर करत आहेत.

कारवाई करणारे पोलीस पथक
​ही धडक व उल्लेखनीय कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील (मुक्ताईनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल व
पोलिस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी, पोलीस कर्मचारी भुषण माळी, सुकराम सावकारे, प्रशांत ठाकुर, गोपी सोनवणे, मनोज मस्के, यासीन पिंजारी, विजू बाविस्कर, ईश्वर तायडे यांचे पथकाने यशस्वीरीत्या कामगीरी पार पाडली.
नागरिकांना पोलीस अधीक्षकांचे आवाहन
​महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वाहतूक करणे हा कायद्याने दंडनीय अपराध आहे. अशा बेकायदेशीर धंद्यांना कोणीही प्रोत्साहन देऊ नये. आपल्या परिसरात अशी कोणतीही अवैध माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याला किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव व ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.”
श्रीकांत धिवरे
(पोलीस अधीक्षक, जळगाव)

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या