Saturday, July 25, 2026
Homeजळगावबालसंगोपन योजनेचा ३ वर्षांपासूनचा प्रलंबित निधी त्वरित वितरीत करा : जिल्हाध्यक्ष राकेश...

बालसंगोपन योजनेचा ३ वर्षांपासूनचा प्रलंबित निधी त्वरित वितरीत करा : जिल्हाध्यक्ष राकेश सोनार.

बालसंगोपन योजनेचा ३ वर्षांपासूनचा प्रलंबित निधी त्वरित वितरीत करा : जिल्हाध्यक्ष राकेश सोनार.

यावल    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी              दि.२५
बालसंगोपन योजनेचा ३ वर्षांपासूनचा प्रलंबित निधी त्वरित वितरीत करा या संदर्भात
राकेश सोनार जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रावेर लोकसभा यांनी महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना जळगाव येथे निवेदन दिले.

दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की जळगाव जिल्ह्यातील ‘बालसंगोपन योजना’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचा गेल्या ३ वर्षांपासून प्रलंबित असलेला निधी त्वरित वितरीत करण्यात यावा आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांना कडक निर्देश देण्यात यावी अशी मागणी
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. आदितीताई तटकरे यांना जळगाव येथे प्रत्यक्ष भेटून करण्यात आली.

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत अनाथ निराधार आणि गरजू बालकांच्या संगोपनासाठी ‘बालसंगोपन योजना’ राबवली जाते.ही योजना बालकांसाठी अत्यंत दिलासादायक असली तरी,जळगाव जिल्ह्यात गेल्या ३ वर्षांपासून पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा नियमित लाभ मिळालेला नाही
लाभ वेळेवर न मिळाल्यामुळे या चिमुकल्यांचे शिक्षण,आरोग्य आणि संगोपनावर अत्यंत विपरीत परिणाम होत आहे. तसेच हातावर पोट असलेल्या गरजू पालकांना व नातेवाईकांना लाभाच्या आशेने शासकीय कार्यालयांचे वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जिल्ह्यातील अनेक पात्र आणि गरजू बालके आपल्या हक्काच्या लाभापासून वंचित राहत आहेत, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
पात्र लाभार्थ्यांना दरमहा नियमितपणे लाभ मिळण्यासाठी संबंधित यंत्रणेला तातडीने सक्त सूचना देण्यात याव्यात.
लाभार्थ्यांना शासकीय कार्यालयांत होणारा नाहक त्रास थांबवून ही संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक करण्यात यावी. याप्रकारे दिलेल्या निवेदनाद्वारे राकेश सोनार यांनी
मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या