तत्कालीन तहसीलदार यांचा आदेश आढळून येत नसल्याने आदेश बनावट,बोगस असल्याचा संशय..!

यावल खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – तत्कालीन तहसीलदार महेश पवार यांनी दि.२/८/२०२२ रोजी
तत्कालीन मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे दिलेला आदेश दप्तरी आढळून येत नाही अथवा नोंदच्या कागदपत्रांमध्ये दिसून येत नाही असे लेखी पत्र यावल येथील विद्यमान ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी यांनी दिल्याने तो दिलेला आदेश बनावट, बोगस आहे का.? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती यावल येथील ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी यांना दि.५ मे २०२६ रोजी माहितीचा अर्ज देऊन माहिती मागितली असता ग्राम महसूल अधिकारी यांनी दि.३ जून २०२६ रोजी मागितलेली माहिती बाबत लेखी पत्र देऊन दि.२ /८ /२०२२ च्या आदेशाची प्रत मागितल्यानुसार दप्तरी पाहणी केली असता असा आदेश आढळून येत नाही अथवा सदर नोंदच्या कागदपत्रांमध्ये दिसून येत नाही अशी लेखी उत्तर दिल्याने तत्कालीन तहसीलदार पवार यांचा दि. २/८/२o२२ चा आदेश बनावट बोगस कोणी व कसा.? तयार केला याबाबत संशयाला जागा निर्माण झाली आणि तत्कालीन मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी संगनमताने नोंद मंजूर कशी आणि कोणाच्या आदेशान्वये केली याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून तलाठी कार्यालयातील एका नोंद मध्ये नमूद असलेल्या तहसीलदारांच्या आदेशाबाबत विद्यमान प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार असल्याने कारवाई काय होणार.? याकडे तक्रारदार यांच्यासह तालुक्यातील शेतकरी,नागरिक महसूल मधील अधिकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे.

