Wednesday, July 29, 2026
Homeजळगावयावल शहरात जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल आणि सरस्वती विद्या मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव...

यावल शहरात जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल आणि सरस्वती विद्या मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा.

यावल शहरात जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल आणि सरस्वती विद्या मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा.

यावल   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                       दि.२९
आज बुधवार दि.२९ या दिवशी येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल मध्ये आणि सरस्वती विद्या मंदिरात गुरुपौर्णिमा हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

गुरुपौर्णिमा उत्सव शाळेच्या प्राचार्या रंजना महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तसेच इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्या दिपाली धांडे यांच्यासह शाळेतील शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी पर्यवेक्षिका गौरी भिरूड व राजश्री लोखंडे यांच्या व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
रंजना महाजन यांनी महर्षी व्यास महाराजांच्या प्रतिमेला हार व पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.सर्वांनी मिळून गुरूचा श्लोक म्हटला.वैशाली अडकमोल व सुवर्णा पाटील यांनी व्यास महाराजांबद्दल माहिती सांगितली.व गुरु व शिष्याचे महत्त्व व त्यांचे नाते कसे असावे हे सांगितले.
इयत्ता १ ते ४ थी सेमी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले.
त्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्या दिपाली धांडे यांनी गुरूबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन पूनम कोळंबे यांनी केले.तसेच हा कार्यक्रम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला.

त्याचप्रमाणे येथील सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सव साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक बी.सी. ठाकूर होते.व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक

 

एन.डी.भारुडे,एस.बी. चंदनकार,बी पी वैद्य,ए एस सूर्यवंशी,दिपक जोशी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात प्रथम महर्षीव्यास ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक यांनी भारुडे यांनी केले यांनी आपल्या प्रास्ताविकात महर्षीव्यास ऋषी यांच्या विषयी माहिती सांगत गुरुपौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आपली मनोगत व्यक्त केली.यामध्ये प्रत्येकाच्या जीवनात गुरूंचे स्थान याविषयी विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त केली. काहींनी गुरूंची महती श्लोकांच्या व गायनाच्या माध्यमातून विषद केली. यानंतर एस बी चंदनकार यांनी गुरू व विद्यार्थी यांच्या संबंधाच्या संदर्भात मार्गदर्शन केले. डॉ नरेंद्र महाले यांनी आयुष्यात सदगुरू यांचे स्थान विविध उदाहरणांनी विषद केले. दिपक जोशी यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष भाषणात बी सी ठाकूर सर यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात सदविचारांची जोपासना करण्याची मार्गदर्शन केले. .कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे गुरुविषयी विद्यार्थी,शिक्षक यांनी मार्गदर्शन केले त्या माहितीवर प्रश्नमंजुषा स्पर्धा ही देखील घेण्यात आली व विद्यार्थ्यांना बक्षीस देखील देण्यात आली. कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गार्गी व्यवहारे मॅडम तर आभार निता पाटील मॅडम यांनी मांडले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या