Wednesday, September 16, 2026
Homeजळगावहतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले ' नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले ‘ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले ‘ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा                                             भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                  तापी नदीच्या उगम क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धरणाची सुरक्षितता आणि जलपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने हतनूर धरणाचे तब्बल 41 दरवाजे उघडले असून तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.या निर्णयामुळे तापी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस सुरू आहे.त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकात मोठी वाढ झाली.धरणातील जलसाठा वेगाने वाढत असल्याने प्रशासनाने

 

परिस्थितीचा आढावा घेत दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला.सध्या तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने नदीच्या प्रवाहात लक्षणीय वाढ झाली , धरणाची जलपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी टप्प्याटप्प्याने दरवाजे उघडण्यात आले.पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ करण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या