Wednesday, September 16, 2026
Homeजळगावसततच्या पावसाने घरात व गुरांच्या गोठ्यात शिरले पाणी हजारो रुपयांचा चारा झाला...

सततच्या पावसाने घरात व गुरांच्या गोठ्यात शिरले पाणी हजारो रुपयांचा चारा झाला ओला.

दहिगावात सततच्या पावसाने घरात व गुरांच्या गोठ्यात शिरले पाणी हजारो रुपयांचा चारा झाला ओला.

यावल     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी    दि.१  काल दि.३१ जुलै रोजी सतत धार झालेल्या दमदार पावसामुळे यावल तालुक्यातील दहिगाव येथे गुरांच्या गोठ्यासह अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने हजारो रुपयांचे गुरांचा चारा ओला होऊन आर्थिक नुकसान झाले ग्रामस्थांमध्ये याबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दहिगाव येथील सुरेश आबा नगरात पाण्याचा तलाव साचला

 

येण्या-जाण्याचा रहिवाशांना त्रास होत आहे.तर येथील सावखेडा सिम रस्त्यालगत असलेल्या गुरांच्या गोठ्यांमध्ये गटारीचे काम अपूर्ण केल्यामुळे पाणी शिरले आहे तर एका घरात पाणी शिरून चीज वस्तू खराब झालेले आहेत.नथू शिवराम पाटील आणि सुनील धनराज पाटील यांचे घरात आणि गुरांच्या गोठ्यात पाणी शिरल्याने हजारो रुपयांचा चारा ओला झाला गुरे सुद्धा पाण्यातच आहेत.या ठिकाणी बांधकाम केलेल्या गटारीचे अपूर्ण काम केल्यामुळे हे पाणी या गोठ्यांमध्ये शिरले आहे.दरवर्षी पाणी कितीही आले तरी या गोठ्यांमध्ये पाणी शिरत नव्हते असे रहिवाशांचे म्हणणे आहे.पाण्याचा निचरा व्यवस्थित न काढल्याने आणि ग्रा.पं.चे दुर्लक्षामुळे हा प्रकार झालेला असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.गटारीतून वाहून जाणारे पाण्याचे नियोजन संबंधित ठेकेदाराने करावे आणि याकडे

 

 

ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ करीत आहेत. तर दुसरीकडे आदर्श विद्यालयासमोर असलेल्या नाल्याला पाणी आल्याने,लहान मुले चिमुकले या पाण्याचा आनंद घेत असताना दिसून येत आहेत.सुनील पाटील यांचे घरात पाणी शिरले यात त्यांच्या काही घरातील वस्तू पाण्यामध्ये ओल्या होऊन आर्थिक नुकसान झाले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या