Thursday, August 6, 2026
Homeजळगावविश्व ज्योती चौकातील पुरुषांची सार्वजनिक मुतारीचे नवीन बांधकाम करा. नगरसेवक सागर चौधरी

विश्व ज्योती चौकातील पुरुषांची सार्वजनिक मुतारीचे नवीन बांधकाम करा. नगरसेवक सागर चौधरी

विश्व ज्योती चौकातील पुरुषांची सार्वजनिक मुतारीचे नवीन बांधकाम करा.
नगरसेवक सागर चौधरी

यावल   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी       दि. ६
यावल शहरातील प्रभाग क्र. ८ मधील विश्वज्योती चौक येथील तथा बाजार पेठेत सर्वांसाठी आवश्यक असलेली जुनी सार्वजनिक मुतारी पाडून त्याच ठिकाणी नवीन आधुनिक मुतारी बांधकाम करण्याची मागणी नगरसेवक सागर चौधरी यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

नगरसेवक सागर चौधरी यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की यावल नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ८ मधील विश्वज्योती चौक येथे असलेली सार्वजनिक मुतारी अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून तिचे बांधकाम मोडकळीस आले आहे.सदर मुतारीच्या भिंती कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या जीवितास व सुरक्षिततेस धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या मुतारीचा वापर करणेही धोकादायक झाला आहे.

तरी सदर जीर्ण झालेली मुतारी तात्काळ तांत्रिक पाहणी करून आवश्यक असल्यास पाडण्यात यावी व त्याच ठिकाणी सर्व आधुनिक सुविधांनी युक्त नवीन सार्वजनिक मुतारीचे बांधकाम करण्यात यावे.तसेच या कामासाठी आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देऊन निधी उपलब्ध करून कामास तातडीने प्रारंभ करण्यात यावा.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या व सार्वजनिक हिताच्या दृष्टीने या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी नगरसेवक सागर चौधरी यांनी केली आहे. या कौतुकास्पद मागणीमुळे यावल शहरातील मुख्य रस्त्यावरील व्यापारी वर्गाची तसेच येणाऱ्या जाणाऱ्या सुविधा उपलब्ध होणार असल्याची चर्चा संपूर्ण यावल शहरात सुरू झाली.

यावल शहरातील वार्ड रचना बघता यावल शहरात इतरही काही महत्त्वाच्या ठिकाणी स्त्री- पुरुषांसाठी स्वतंत्र अशा मुतारीचे, शौचालयाची सुविधा नगर परिषदेने उपलब्ध करून द्यायला पाहिजे अशी सुद्धा यावल शहरातील प्रत्येक प्रभागात चर्चा आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या