Sunday, August 9, 2026
Homeजळगावसुशीला राम कदम प्राथमिक विद्यामंदिरात पालक-शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना

सुशीला राम कदम प्राथमिक विद्यामंदिरात पालक-शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना

सुशीला राम कदम प्राथमिक विद्यामंदिरात पालक-शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी         वरणगाव ता भुसावळ :

श्रीनाथ एज्युकेशनद्वारा संचलित सुशीला राम कदम प्राथमिक विद्यामंदिर, वरणगाव येथे शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी पालक-शिक्षक संघाची सभा तसेच शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली. या सभेला पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय नागरे होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. चौधरी, ज्येष्ठ शिक्षिका सौ. आर. आर. चौधरी, पालक-शिक्षक संघाच्या माजी सदस्या सौ. विद्या पाटील, सर्व शिक्षकवृंद तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी पालक-शिक्षक संघाची तसेच शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली. पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी रुपेश कुलकर्णी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापिका एस. एस. चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी पालकांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर मर्यादित ठेवावा, पालकांनी मुलांशी दररोज संवाद साधावा तसेच मुलांना नियमितपणे शाळेत पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले.

सौ. आर. आर. चौधरी यांनी शिक्षक व पालकांच्या अडी-अडचणींबाबत मार्गदर्शन करताना त्यावर परस्पर चर्चेतून तोडगा काढण्याचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जंक फूडचे सेवन टाळण्याबाबत पालकांना माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वाय. एस. वसावे यांनी केले. मागील सभेचे इतिवृत्त परतणे मॅडम यांनी वाचून दाखविले. नवीन पालक-शिक्षक संघाची स्थापना श्री. व्ही. पी. झोपे सर व सौ. एस. एस. चौधरी मॅडम यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी श्री. व्ही. पी. झोपे सर यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पालकांना महत्त्वपूर्ण माहिती दिली.

मुख्याध्यापिका एस. एस. चौधरी यांनी शाळेतील विविध अडी-अडचणी व शैक्षणिक बाबींवर पालकांशी चर्चा केली. अध्यक्षीय भाषणात पोलीस उपनिरीक्षक श्री. विजय नागरे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्या शिस्तबद्ध व जबाबदार जडणघडणीसाठी शाळा आणि पालकांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती वासंती जोशी यांनी केले. पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम उत्साहात व यशस्वीपणे पार पडला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या