Thursday, August 13, 2026
Homeजळगावराज्यातील अल्पसंख्याक शाळांच्या प्रश्नांसाठी शासन सकारात्मक : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

राज्यातील अल्पसंख्याक शाळांच्या प्रश्नांसाठी शासन सकारात्मक : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

राज्यातील अल्पसंख्याक शाळांच्या प्रश्नांसाठी शासन सकारात्मक : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

भुसावळ :   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी         अल्पसंख्याक शिक्षण संस्थांच्या विविध प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून, संबंधित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्राताई अजित पवार यांची बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबई येथील सह्याद्री भवनात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन अल्पसंख्याक शिक्षण संस्थांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. विशेषतः अल्पसंख्याक शाळांच्या दर्जा प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासह संस्थांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींबाबत शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री पवार यांचे लक्ष वेधले. यासंदर्भातील निवेदनही यावेळी त्यांना देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेशभाऊ नेमाडे यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात भुसावळचे माजी उपनगराध्यक्ष आशिक खान, जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष तथा फैजपूरचे माजी उपनगराध्यक्ष कुरबान शेख, संस्था अध्यक्ष उसामा रऊफ खान, शकील सर आणि नदीम सर यांची उपस्थिती होती .

अल्पसंख्याक शिक्षण संस्थांना शासनस्तरावर येणाऱ्या अडचणी, दर्जा प्रमाणपत्र नूतनीकरणाची प्रक्रिया तसेच इतर विविध प्रश्नांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे शिक्षण संस्थांच्या कामकाजातील प्रशासकीय अडचणी दूर होण्यासह प्रलंबित प्रश्नांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ना सुनेत्रा पवार यांनी या प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा केल्याने अनेक वर्षा पासून प्रलंबित असलेले अल्प संख्याक शिक्षण संस्था चे कामे होतील व संस्थांचा दर्जा उंचावणार आहे असे बोलले जाते .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या