Sunday, August 16, 2026
Homeजळगावकिनगाव खुर्द येथे ग्रा.पं.मध्ये पाणी पुरवठा कर्मचारी यांचे हस्ते ध्वजारोहण.

किनगाव खुर्द येथे ग्रा.पं.मध्ये पाणी पुरवठा कर्मचारी यांचे हस्ते ध्वजारोहण.

किनगाव खुर्द येथे ग्रा.पं.मध्ये
पाणी पुरवठा कर्मचारी यांचे हस्ते ध्वजारोहण.

यावल   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     दि.१६
गावातील पाणीपुरवठाचे महत्त्वपूर्ण काम करणारे ग्रामपंचायत किनगाव खुर्द तालुका यावल येथील पाणी पुरवठा कर्मचारी प्रकाश भगवान कोळी यांच्या हस्ते भारतच्या स्वातंत्र्यदनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले सरपंच सौ.रुपाली दगडू कोळी व ग्रामसेवक श्रीमती सोनाली अरुण सोनवणे व ग्रामपंचायत उपसरपंच रियाज सुजतखा तडवी आणि सदस्य व सदस्या यांच्या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.

किनगाव खुर्द तालुका यावल येथे स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर गावात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला.गावातील पाणीपुरवठा कर्मचाऱ्याने अभिमानाने तिरंगा फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. तसेच किनगाव खुर्द व किनगाव बुद्रुक येथील शाळेच्या विद्यार्थ्याच्या सहभागाने स्वतंत्र सोहळा जल्लोषात साजरा झाला.या उपक्रमामुळे गावात आनंदाचे व देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

गावातील प्रत्येक कुटुंबाला नियमित आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. पाणीपुरवठा कर्मचारी प्रकाश भगवान कोळी ऊन, पाऊस याची पर्वा न करता गावकऱ्यांच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी कार्यरत असतात. त्यामुळे त्यांच्या सेवेला ग्रामजीवनात विशेष महत्त्व आहे. पाणी ही केवळ गरज नसून आरोग्य, स्वच्छता आणि दैनंदिन जीवनाचा आधार असल्याने सुरळीत पाणीपुरवठा ही गावाच्या विकासाची महत्त्वाची बाब मानली जाते.

या संपूर्ण व्यवस्थेला योग्य दिशा देण्यात सरपंच सौ.रुपाली दगडू कोळी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.गावातील पाणीपुरवठा,स्वच्छता,मूलभूत सुविधा आणि ग्रामविकासाच्या कामांमध्ये सरपंचांच्या नेतृत्वाची भूमिका असते. ग्रामस्थांच्या समस्या ऐकून त्यावर उपाययोजना करण्यासाठी सरपंच सौ.रुपाली दगडू कोळी आणि ग्रामपंचायत कार्यकारिणी सातत्याने प्रयत्नशील असते.
किनगाव खुर्द चे सरपंच ग्रामस्थांच्या समस्येकडे कधीही दुर्लक्ष करीत नाहीत, त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला ते नेहमी सकारात्मक प्रतिसाद देतात आणि निर्माण झालेल्या समस्येमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात जरी कामाला थोडा फार उशीर झाला तरी सदर काम हे व्यवस्थितपणे मार्गी लागते व ग्रामस्थांच्या समस्या पूर्णपणे सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात अशी प्रतिक्रिया उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी दिली.

यावेळी सरपंच सौ.रुपाली दगडू कोळी व ग्रामसेवक श्रीमती. सोनाली अरुण सोनवणे, उपसरपंच श्री. रियाज सुजातखा तडवी व ग्रामपंचायत कार्यकारिणी यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील उपक्रमांना योग्य नियोजन व सहकार्य मिळत असल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. गावाच्या विकासासाठी सरपंच घेत असलेल्या पुढाकाराचे तसेच ग्रामसेवकांच्या प्रशासकीय सहकार्याचे ग्रामस्थांनी कौतुक केले. तसेच गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी व उर्दू शाळेच्या मुख्याध्यापकांनी ग्रामपंचायतीने शाळेला उपलब्ध करून दिलेल्या सुविधांबाबत ऋण व्यक्त करून सरपंच, ग्रामसेवक,उपसरपंच, सदस्य, सदस्या व इतर कर्मचारी यांचे आभार मानले

कार्यक्रमाला सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,पाणीपुरवठा कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. तिरंग्याला मानवंदना देताना उपस्थितांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद स्पष्ट दिसून आला.

“गावाची सेवा, ग्रामस्थांची सुविधा आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान—हीच खरी देशभक्ती,” अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी प्रकाश कोळी यांचे हस्ते ध्वजारोहण घडत असताना तेथे उपस्थित असलेले त्यांचे नातेवाईक या सोहळ्याचे साक्षीदार झाले व अभिमानाने त्यांचे उर भरून आले व आनंदाचा तो क्षण पाहून त्यांचे डोळे पाणावले

ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारीला मिळालेला हा सन्मान फक्त त्यांचा एकट्याचा नसून आम्हा सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाचा असून सर्व कर्मचारी वृंदाला अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली

स्वातंत्र्य दिनानिमित्त या अनोख्या सोहळ्याची सांगता करत असताना सरपंच सौ. रुपाली दगडू कोळी यांनी यापुढेही असेच प्रेरणादायी उपक्रम राबविण्याची ग्वाही दिली,ग्रामसेवक श्रीमती सोनाली अरुण सोनवणे यांनी ग्रामस्थांना सामाजिक कामामध्ये व पर्यावरण संवर्धक उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून सकारात्मक पद्धतीने सहभाग घेण्याचे आवाहन केले व ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी श्री. प्रकाश भगवान कोळी यांनी सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक तथा ग्रामपंचायत कार्यकारिणीचे आभार व्यक्त केले आणि २० ते २५ सेवेच्या वर्षांमध्ये आपल्याला पहिल्यांदा मिळालेल्या ध्वजारोहणाचा सन्मानाबद्दल त्यांनी सरपंच सौ.रुपाली दगडू कोळी यांचे विशेष आभार व्यक्त केले व अशाप्रकारचे सरपंच,उपसरपंच ग्रामसेवक,व ग्रामपंचायत कार्यकारिणी प्रत्येक गावाला मिळावे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या