Sunday, August 16, 2026
Homeजळगावश्रीकृष्ण हायस्कूल शिंदी येथे स्वातंत्र्य दिन साजरा..

श्रीकृष्ण हायस्कूल शिंदी येथे स्वातंत्र्य दिन साजरा..

श्रीकृष्ण हायस्कूल शिंदी येथे स्वातंत्र्य दिन साजरा….
भुसावळ खानदेश ला इंग्लिश प्रतिनिधी             शिंदी, ता. भुसावळ (वार्ताहर)– युवक मंडळ स्थानिक एज्युकेशन सोसायटी शिंदी संचलित श्रीकृष्ण हायस्कूल शिंदी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष विरेंद्र कोल्हे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपाध्यक्ष प्रविण नेमाडे ,सचीव सुभाष कोल्हें , विश्वस्त शरद ढाके, ऋषीकेश महाजन, , महेंद्र कोल्हे, भोजराज महाजन उपस्थित होते.
शाळेतील ध्वजारोहणा नंतर गितमंच गाणी होऊन स्काऊट व गाईड विद्यार्थ्यांची संचलने झाली .देशभक्तीपर घोषणांनी सारा परिसर दुमदुमुन गेला. शासकीय परिपत्रकानुसार कवायतीचे विविध प्रकार विद्यार्थ्यंनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तंबाखु मुक्ती व कॉपी मुक्त ची शपथ विद्यार्थ्यांकडून घेण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक बी. पी. वारके शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले . मोठ्या सख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या