Wednesday, September 16, 2026
Homeजळगावगणेशोत्सवात डीजेचा दणदणाट नको ; पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य

गणेशोत्सवात डीजेचा दणदणाट नको ; पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य

गणेशोत्सवात डीजेचा दणदणाट नको ; पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य

शांतता समितीच्या बैठकीत पोलिस प्रशासनाच्या गणेश मंडळांना स्पष्ट सूचना; समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टपासून सावध राहण्याचे आवाहन                      वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                     वरणगाव ता भुसावळ :
आगामी गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर वरणगाव पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता शांतता समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत गणेश मंडळांनी डीजेचा दणदणाट टाळून पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, अशा स्पष्ट सूचना मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलिस अधिकारी नंदराज पाटील यांनी दिल्या.

गणेशोत्सव हा धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक सलोखा आणि संस्कृती जपणारा उत्सव आहे. त्यामुळे उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी पोलिस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे संदेश, अफवा किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अशा पोस्टपासून सावध राहावे. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील असे देखावे, घोषवाक्ये अथवा कार्यक्रम आयोजित करू नयेत, अशा सूचनाही पोलिस प्रशासनाने दिल्या.गणेश मंडळांनी केवळ मनोरंजन आणि ध्वनिप्रदूषणावर भर न देता सामाजिक उपक्रमांना प्राधान्य द्यावे, असे पाटील यांनी सांगितले. रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, गरजू विद्यार्थ्यांना मदत यांसारख्या उपक्रमांतून गणेशोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देण्याचे आवाहन करण्यात आले.

भक्ती, संस्कृती आणि शिस्तीचा उत्सव – –
‘गणेशोत्सव म्हणजे दणदणाट नव्हे, तर भक्ती आणि संस्कृतीचा उत्सव आहे,’ अशी ठाम भूमिका बैठकीत नागरिकांनी मांडली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक उत्साहासोबतच सामाजिक एकोपा आणि बंधुभाव वाढला पाहिजे. त्यामुळे वरणगावचा गणेशोत्सव पारंपरिक, सुसंस्कृत, शिस्तबद्ध आणि शांततेत साजरा करण्यासाठी गणेश मंडळे, नागरिक आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रास्ताविका वरणगाव पोलिस स्टेशन चे सपोनि अमित कुमार बागुल यांनी केली . यावेळी नगरध्यक्ष सुनील काळे , उपनध्यक्षा अरुणा इंगळे , पालिकेचे ओ एस रशिद नौरंगाबंदी उपस्थित होते .
बैठकीस वरणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शांतता समिती व मोहल्ला कमिटीचे सदस्य, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलिस पाटील, प्रतिष्ठित नागरिक तसेच वाद्य मालक व चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोलिस विजय बावस्कर , प्रशात ठाकुर आदींनी केले .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या