वरणगावात सामाजिक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश


जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश सोहळा उत्साहात वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव, ता. भुसावळ :
शहरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते राजेश बोदडे व त्यांच्या धर्मपत्नी ललिता बोदडे यांच्यासह आरती माळी, कविता जाधव आणि रेखा गायकवाड यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर व विकासकामांवर विश्वास व्यक्त करत या सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे यावेळी सांगितले.शिवसेनेच्या माध्यमातून वरणगाव शहराच्या विकासासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक विलास मुळे, विधानसभा प्रमुख संतोष माळी, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र विश्वनाथ चौधरी, शहरप्रमुख दुर्गेश बेदरकर, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सविता माळी, मनीषा पाटील, रेखा देशमुख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे उपस्थित मान्यवरांनी पक्षात स्वागत करून त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या पक्षप्रवेशामुळे वरणगाव शहरातील शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीत वाढ होणार असल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

