Saturday, September 12, 2026
Homeजळगावअंजनसोंडे येथे दोन माकडांचा मृत्यू; सर्पमित्रांनी ग्रामस्थांच्या मदतीने केले अंत्यसंस्कार

अंजनसोंडे येथे दोन माकडांचा मृत्यू; सर्पमित्रांनी ग्रामस्थांच्या मदतीने केले अंत्यसंस्कार

अंजनसोंडे येथे दोन माकडांचा मृत्यू; सर्पमित्रांनी ग्रामस्थांच्या मदतीने केले अंत्यसंस्कार

वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             वरणगाव, ता. भुसावळ :
तालुक्यातील अंजनसोंडे गावात दोन माकडे मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गावातील मुजेबा मंदिराजवळ आणि फॅक्टरी सुसप्लॅन माकडे मृत अवस्थेत आढळून आली.

गावातील दीपक गोपाळ कोळी, हर्षल संजय कोळी आणि मोनज अरुण कोळी यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तातडीने धाडसी वाल्मीक ग्रुप, अंजनसोंडे यांच्या सदस्यांना याबाबत माहिती दिली. ग्रुपच्या सदस्यांनी तत्काळ वरणगाव येथील सर्पमित्र विजय सोनार व मुन्ना फालक यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच सर्पमित्र विजय सोनार व मुन्ना फालक यांनी अंजनसोंडे येथे जाऊन घटनास्थळी पाहणी केली. दोन्ही माकडे मृत असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने शेतात योग्य ठिकाणी खड्डा खोदला. त्यानंतर दोन्ही माकडांवर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.
वन्यजीवांप्रती संवेदनशीलता जपत सर्पमित्रांनी दाखविलेल्या तत्परतेचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. वन्यजीव मृतावस्थेत आढळल्यास त्याची माहिती संबंधित वनविभागाला देणे तसेच मृत प्राण्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. या घटनेतही नागरिकांनी संवेदनशीलता दाखवत सर्पमित्रांच्या माध्यमातून मृत माकडांवर अंत्यसंस्कार केले.
वनविभागाचे अधिकारी विकास गायकवाड हे उपस्थित होते .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या