राजकारणाच्या पलीकडे मैत्रीचा धागा ! अतुल पाटलांच्या वाढदिवशी सर्व समाजघटकांकडून,गुरुजन शिक्षक मंडळी कडून शुभेच्छांचा वर्षाव
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि. १२ यावल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आणि यावल शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.छायाताई अतुल पाटील यांचे पती अतुल वसंतराव पाटील यांचा वाढदिवस शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी त्यांच्या निवासस्थानी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात
आला.वाढदिवसानिमित्त सकाळ पासूनच विविध क्षेत्रातील मान्यवर,गुरुजन,राजकीय पदाधिकारी,कार्यकर्ते,सामाजिक
कार्यकर्ते तसेच नागरिकांनी प्रत्यक्ष भेटी देत अतुल पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांसह यावल शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांतील गुरुजनांनी तसेच विविध सामाजिक,राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींनी अतुल पाटील यांची भेट घेऊन पुष्पहार,पुष्पगुच्छ,शाल व श्रीफळ देत त्यांचे अभीष्टचिंतन केले.यावेळी त्यांच्या निरोगी, दीर्घायुषी आयुष्यासह सामाजिक व राजकीय कार्याला अधिक व्यापक यश मिळावे,अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
अतुल पाटील यांनी नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात तसेच विद्यमान नगरसेवक म्हणून शहरातील विविध प्रश्नांशी सातत्याने संपर्क ठेवला असल्याने त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी विविध स्तरातील नागरिकांची उपस्थिती दिसून आली.
विशेष म्हणजे कोणताही भेदभाव न ठेवता सर्व जाती,धर्म आणि समाजघटकांशी सलोख्याचे संबंध जपण्याची सामाजिक भूमिका ही त्यांच्या शुभेच्छा कार्यक्रमातूनही अधोरेखित झाली.राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न राहता समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारे माध्यम ठरावे,नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी,अशी अपेक्षाही यानिमित्ताने व्यक्त करण्यात आली.
वाढदिवसानिमित्त सकाळपासून सायंकाळपर्यंत शुभेच्छांचा ओघ सुरू राहिल्याने अतुल पाटील यांच्या निवासस्थानी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून विविध विचारांच्या व्यक्तींनी दिलेल्या शुभेच्छांमुळे सामाजिक सलोखा आणि लोकसंपर्काची सकारात्मक छबी या कार्यक्रमातून दिसून आली.
यावेळी शिक्षक,सामाजिक कार्यकर्ते,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, नगरसेवक,व्यापारी,युवक,ज्येष्ठ नागरिक तसेच शहरातील विविध समाजघटकांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही बड्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या वेळेअभावी भ्रमणध्वनी वरून शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छांचा स्वीकार करताना अतुल पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

