Saturday, September 12, 2026
Homeजळगावजिल्हास्तरीय ग्रॅपलिंग स्पर्धेमध्ये हनुमान व्यायाम शाळेच्या मल्लांची बाजी.   राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हरिद्वार येथे...

जिल्हास्तरीय ग्रॅपलिंग स्पर्धेमध्ये हनुमान व्यायाम शाळेच्या मल्लांची बाजी.   राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हरिद्वार येथे जाणार 

जिल्हास्तरीय ग्रॅपलिंग स्पर्धेमध्ये हनुमान व्यायाम शाळेच्या मल्लांची बाजी.   राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हरिद्वार येथे जाणार
.
वरणगाव    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी       १९ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिकृत ग्रॅपलिंग (मल्लयुद्ध) संस्थेच्या जिल्हास्तरीय स्पर्धा नुकत्याच धुळे येथे संपन्न झाल्या . त्यामधे वरणगाव येथिल श्री हनुमान व्यायाम शाळेच्या मल्लांनी घवघवीत यश मिळविले . त्यांचे राज्य ग्रॅपलिंग संस्थेच्या अध्यक्षा अर्चना देशमुख व राज्य सचिव संतोष देशमुख यांनी मेडले देवून कौतुक केले.

१९ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय ग्रॅपलिंग (मल्लयुद्ध)चॅम्पीयन २०२६ च्या जिल्हास्तरीय स्पर्धा नुकत्याच धुळे येथिल क्रिडा संकूल मधे संपन्न झाल्या . या स्पर्धेमध्ये हनुमान व्यायाम शाळा वरणगाव , तथा जिल्हा ग्रॅपलिंग असोशिएशन वरणगाव च्या मल्लांनी घवघवीत यश संपादन केले . त्यात १३ वर्षाखालिल ४२ किलोच्या आतील गटात ओम भरत माळी याने नो- गी प्रकारात गोल्ड मेडल व मल्ल युद्ध प्रकारात बॉझ मेडल मिळविले , १५ वर्षाखालिल ४७ किलोच्या आतील गटात नामेश्वर भरत माळी याने नो- गी प्रकारात सिल्वर मेडल व मल्ल युद्ध प्रकारात बॉझ मेडल मिळविले , तर सुनिल शिवाजी कचरे याने ७३ किलोच्या आतील वजनी गटात नो- गी प्रकारात ब्राँझ मेडल व मल्ल युद्ध प्रकारात गोल्ड मेडल मिळविले , ओम गणेश महाजन याने १०० कि . च्या आतील गटात नो- गी प्रकारात गोल्ड मेडल व मल्ल युद्ध प्रकारात सिल्वर मेडल मिळविले आहे ,तर सिनियर वरिष्ठ ६६ कि . च्या आतील गटात नो- गी प्रकारात गोल्ड मेडल मिळविले आहे . पुढिल स्पर्धा हरिद्वार ( उत्तराखंड ) येथे दि . २४ ते २६ आक्टोबर दरम्यान होणार असुन सर्व यशस्वी मल्ल त्या ठिकाणी खेळण्यासाठी जाणार आहेत . अशी माहिती
जिल्हाअध्यक्ष पैलवान संजय बावस्कर, उपाध्यक्ष पैलवान उत्तम भोई ,सचिव पैलवान दिलीप संगेले सहसचीव: बाळासाहेब चव्हाण, कोषाध्यक्ष व सदस्य यांनी दिली . सर्व खेळाडूंचा सत्कार श्री हनुमान व्यायाम शाळेचे अध्यक्ष सुनिल काळे ,उपाध्यक्ष नामदेव पहेलवान , संजय बावस्कर . विनोद झोपे ,एकनाथ पहेलवान , चुडामण वाघ , विनोद पटेल , संजय चौधरी , दिनेश देशमुख, इच्छाराम पैलवान , दिलीप पहेलवान , रमेश पहेलवान, उत्तम पहेलवान तसेच इतर सर्व पहेलवान यांनी केला .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या