Saturday, September 12, 2026
Homeजळगावसाकेगावात मरीमाता यात्रेचा उत्साह; बारागाड्या ओढण्याची शेकडो वर्षांची परंपरा कायम

साकेगावात मरीमाता यात्रेचा उत्साह; बारागाड्या ओढण्याची शेकडो वर्षांची परंपरा कायम

साकेगावात मरीमाता यात्रेचा उत्साह; बारागाड्या ओढण्याची शेकडो वर्षांची परंपरा कायम

पोळ्यानिमित्त मरीमाता यात्रेचे आयोजन; धार्मिक व सांस्कृतिक वातावरणात हजारो भाविकांची उपस्थिती
भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            तालुक्यातील साकेगाव
भारतीय सण-संस्कृती-परंपरा
पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सन्मान करणारा हा एक मराठी सण असून हा सण विशेषतः महाराष्ट्रात साजरा केला जातो. भारतासारख्या शेतीप्रधान देशात या सणाला विशेष महत्त्व आहे. सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा..याच पोळ्या निमित्त साकेगांव येथे दर वर्षी प्रमाणे मरीमाता यात्रेचे आयोजन करण्यात येते..या करीता गेल्यां आठ ते दहा दीवसा पासुन याची रुप रेषा आखणी सुरु होती प्रथम मंदीर परिसराची साफ सफाई करण्यात आली मंदीराची रंग रंगोटी करण्यात आली आहे म़दीरावर व परीसरावर विद्युत रोषणाईणे लख लखाट करण्यात आले आहे या यात्रेचे वैषीष्ट म्हणजे बारागाड्या ओढणे आहे…

सालाबाद प्रमाणे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मरी माता यात्रेचा उत्सव दरवर्षी पार पडतो शेकडो वर्षाची ही परंपरा जोपासत साकेगावतील बारा गाड्या ओढण्याची परंपरा भक्तांनी कायम राखली.

महामार्गाच्या पलीकडे असलेले दत्त मंदीरा पासुन ते मरीमाता पर्यंत महामार्गाच्या बोगद्याखालून सजवलेल्या बारागाड्या साकेगांव येथील भगत गाडेवान सुरेश धनगर
बगले वाल्मीक कोळी, जयराम धनगर, ओटी वाले -सुरेश कोळी
भगत – नथू ठाकरे, गिरधर कुरकुरे, धर्मराज मराठे( नवनाथ बाबा ), दगडू धनगर, दगडू पाटील, सुनील कोळी, अनंता भिल, प्रकाश पाटील, सुखदेव भोई, बाळू कुंभार, नारायण कोळी
सहकार्य – संजय मांडे, चंद्रकांत कोळी, गणेश भोई (पोलीस पाटील) किसन सपकाळे, पुंडलिक पाटील, गणेश कोळी,माणिक कोळी, कैलास सपकाळे, राहुल चौधरी, विलास ठोके

 


सवासनी- कार्तिकी सपकाळे, माही सपकाळे,व सहकारी भक्तमंडळीणी बारा गाड्या ओढल्या

शेकडो वर्षाची बारागाड्या ओढण्याची ही परंपरा, प्रथा आजच्या युगात टीकवुन आहे यामुळे गावात धार्मिक व सांस्कृतिक वातावरण निर्मिती होते
सविस्तर माहीती अशी की भुसावळ तालुक्यातील साकेगांव येथे दरवर्षि प्रमाने पोळ्याच्यादुस-या दीवशी सालाबाद प्रमाणे मरीमातेच्या यात्रेनिमीत्त यात्रेच्या दीवशी बारा गाड्या ओढल्या जातात मोठ्या उत्सवात व धार्मिक वातावरणात हा भव्य दीव्य सोहळा साजरा केला जातो आजच्या इंटरनेट युगात कींचतही हा धार्मिक बारागाड्या उत्सव कमी झालेला दीसून येत नाही तसेच समस्त साकेगांव वासियाकडुन ही शेकडो वर्ष जुनी परंपरा आज पर्यंत टीकवली जात आहे डोळ्याचे पाळणे फीटेल असे हे भव्य दीव्य धार्मिक उत्सव बघण्यासाठी संपूर्ण गावातुन नव्हे,परीसरातुन नव्हे तर खांन्देशातुन जन महासागर उसळलेला असतो अनेक बाहेरगावी गेलेले नागरिकही खास या यात्रेसाठी गावी परततात

हा भव्य दीव्य सोहळा अनेकांनी आपल्या मोबाइल च्या कॕमेरात कैद केले साकेगांव ग्रामपंचायत प्रशासन,व स्थानीय नागरीक रोड प्रशासन हायवे,यांचे मोठे सहकार्य लाभले गावात यात्रा नीम्मीत एक चैत्यनाचे वातावरण निर्माण झाले होते ठीक ठिकानी यात्रे निम्मीत खेळण्याची , जंपिंग जैक, मोठ मोठे आकाशगगनी झोके, लहान मुलांची रेल गाड़ी, खाण्याची व अजुन खुप प्रकारची दुकाणे थाटण्यात आली होती
यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये बारागाड्या उत्सव शांततेत पार पडवा व कायदा सुव्यवस्था अबाधीत राखण्या साठी भुसावळ तालुका पोलिस स्टेशनचे परिवीक्षाधीन उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राजेंद्र चाटे, एएसआय संजय भोई, हेड कॉन्स्टेबल वाल्मीक सोनवणे, विनोद पाटील पोलीस कर्मचारी जगदीश भोई, रशीद तडवी यांच्यासह होमगार्ड, सीआरपी प्लाटून आणि पोलीस
इतर पोलीस स्टॉप व होमगार्ड दंगा नियंत्रणफोर्स सहित पोलीसांचा
कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता

या उत्सवास ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने बारा गाड्या जाणाऱ्या मार्गावर कच,फफुटा टाकण्यात आला व गावाच्या विनंतीस मान देऊन राष्ट्रीय महामार्ग यांची पण मोलाची साथ लाभली त्यांनी बारा गाड्या ओढताना सर्विस रोडवर येणारे धापे व गड्डे दुरुस्त करून गावाच्या विनंतीस मान दिला गावातून त्यांचे पण आभार व्यक्त होत आहे

या वेळी ग्रामपंचायत प्रशासन,हायवे महामार्ग प्रशासन,युवा वर्ग,व समस्त गावकारी, भक्त भविक व महिला भगिनी परीसरातील नागरिक असंख्य संख्येने उपस्थित होते…

साकेगावच्या ग्रामस्थांनी परंपरा आणि सुंदर श्रद्धेचा सुंदर संगम साधत मरी मातायात्रेचे आयोजन केले. बारा गाड्यांच्या थरारक सोहळ्यामुळे यात्रा विशेष आकर्षण ठरली

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या