यावल येथील जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा
यावल. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.११
यावल येथील जे.टी.महाजन स्कूलमध्ये शाळेच्या प्राचार्यां दिपाली धांडे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रम प्राचार्या सौ.रंजना महाजन व पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री लोखंडे यांच्या व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत व कार्यक्रमाचे अध्यक्षा व प्राचार्या सौ.रंजना महाजन व पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे यांच्या हस्ते मातीच्या बैलांचे पूजन करण्यात आले.बैलांना नैवेद्य अर्पण करण्यात आला.
सुजाता पाटील यांनी विद्यार्थ्यांना पोळा या सणाबद्दल माहिती सांगितली.तसेच शाळेतील इंग्लिश मिडीयमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देखील पोळा सणाबद्दल माहिती सांगितली. शाळेतील काही विद्यार्थ्यांनी शेतकरी पोशाखात सजून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.त्यानंतर डिंपल इंगळे यांनी आभार प्रदर्शन केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा बडगुजर यांनी केले.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

