Saturday, September 12, 2026
Homeगुन्हाभुसावळ पुन्हा रेल्वे कर्मचाऱ्याच्या खुनाने हादरले चाकूचे सपासप वार करून ३५ वर्षीय...

भुसावळ पुन्हा रेल्वे कर्मचाऱ्याच्या खुनाने हादरले चाकूचे सपासप वार करून ३५ वर्षीय व्यक्ती ची हत्या अल्पवयीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ पुन्हा रेल्वे कर्मचाऱ्याच्या खुनाने हादरले
चाकूचे सपासप वार करून ३५ वर्षीय व्यक्ती ची हत्या
अल्पवयीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
पोळा सणाचा उत्साह ओसरत असतानाच भुसावळ शहराला हादरवून सोडणारी रक्तरंजित घटना गुरुवारी रात्री घडली आहे काही महिन्या पूर्वी शहरात रेल्वे कर्मचाऱ्याचा खुन झाला होता .
शहरातील पाटीलमळा भागात रेल्वेत कार्यरत असलेल्या 35 वर्षीय तरुणाची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. तुषार गोविंद सोनवणे (वय 35, रा. समता नगर, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसले, तरी घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, तुषार सोनवणे हे गुरुवारी रात्री परिचिताची दुचाकी (एमएच 19 सीएच 1405) घेऊन पाटीलमळा परिसरातून जात होते. याचवेळी त्यांचा एका अल्पवयीन संशयिताशी कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यवसान काही क्षणांतच जीवघेण्या हल्ल्यात झाले. संशयिताने तुषार यांच्या डोक्याच्या मागील बाजूस आणि पाठीवर चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमांमुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन तुषार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

रक्ताच्या थारोळ्यात तरुण; परिसरात खळबळ
गुरुवारी रात्री साडेआठ वाजेनंतर या घटनेची माहिती पोलिसांच्या 112 क्रमांकावर देण्यात आली. माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली.

दरम्यान, जळगाव गुन्हे शाखेचे पथक शहरातच असल्याने त्यांनीही तपासात सहभाग घेतला. हल्ल्यानंतर संशयित पायी पसार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या संभाव्य मार्गाचा माग काढला. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.

वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची बारकाईने पाहणी करण्यात आली. हत्येच्या तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले असून, घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले.

हत्येमागचे गूढ कायम
नेमक्या कोणत्या कारणातून तुषार सोनवणे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला, याचे गूढ अद्याप कायम आहे. वादाचे कारण काय होते, हल्ल्यामागे अन्य काही कारण आहे का, तसेच या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, या सर्व बाबींच्या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.

पोळा सण उत्साहपूर्ण व शांततेत पार पडल्यानंतर रात्रीच्या सुमारास घडलेल्या या निर्घृण हत्येने भुसावळ शहराच्या शांततेला हादरा बसला आहे. पाटीलमळा परिसरातील या रक्तरंजित घटनेमुळे नागरिकांमध्येही खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपीने काही दिवसांपूर्वीच तुषारच्या हत्येचा कट रचला होता. आईसोबत तुषारचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा संशय अल्पवयीन आरोपीच्या मनात होता. या संशयातून निर्माण झालेल्या रागातूनच त्याने हा प्रकार केल्याचे पोलिसांनी सांगितले .या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल तायडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या