भुसावळ दिपनगर येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
फेकरी ता.भुसावळ(वार्ताहर)दि.५
भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगरच्या ५६ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने वनिता मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल जळगाव यांच्या सहकार्याने दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिबिराचे अध्यक्ष मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे होते. प्रसंगी उपमुख्य अभियंता रवींद्र सोनकुसरे, उपमुख्य अभियंता अशोक भगत, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत जाधव, अधीक्षक अभियंता रवींद्र डांगे आणि वनिता हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर भूषण सोमानी उपस्थित होते. सदर शिबिरामध्ये ईसीजी, कॅल्शियम लेवल, ब्लड शुगर लेवल ची तपासणी करण्यात आली व डॉक्टरांकडून कन्सल्टेशन करण्यात आले. यावेळी शिबिराचे सूत्रसंचालन परिचारिका सौ.रेश्मा शर्मा यांनी केले.

