तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत के. नारखेडे विद्यालयाचे सुयश भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजी भुसावळ येथील सेंट अलॉयसिस हायस्कूल येथे शासकीय शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत के. नारखेडे विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विजय संपादन केला असून त्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अंडर-१९ गटात इयत्ता बारावी वाणिज्य शाखेतील झोपे पियुष भूषण, राणे सोहम सागर, अग्रवाल रीशी प्रमोद आणि चौधरी खिलेश ललित या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
तसेच अंडर-१७ मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धेत इयत्ता दहावीतील तडवी अमन जावेद याने उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळविला असून त्याचीही जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीता अडकमोल, उपमुख्याध्यापक श्री. एस. पी. पाठक, पर्यवेक्षक श्री. एस. एल. राणे व श्री. बी. बी. जोगी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक श्री. निलेश नेहेते व श्री. नवीन नेमाडे यांचेही याप्रसंगी विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले.
विद्यालयाच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर पडली असून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धेसाठी विद्यालयाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

