Sunday, September 27, 2026
Homeजळगावमंत्री संजय सावकारे यांच्या प्रयत्नांना यश; शहरातील रस्ते, गटार, पेव्हर ब्लॉकसह अभ्यासिका-ग्रंथालयासाठी...

मंत्री संजय सावकारे यांच्या प्रयत्नांना यश; शहरातील रस्ते, गटार, पेव्हर ब्लॉकसह अभ्यासिका-ग्रंथालयासाठी निधी

वरणगावच्या विकासाला १ कोटी ६० लाखांचा ‘बूस्टर’ !

मंत्री संजय सावकारे यांच्या प्रयत्नांना यश; शहरातील रस्ते, गटार, पेव्हर ब्लॉकसह अभ्यासिका-ग्रंथालयासाठी निधी

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             वरणगाव, ता. भुसावळ :
शहरातील विविध भागांतील मूलभूत सुविधांना चालना देण्यासाठी सन २०२६-२७ जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वरणगाव नगरपरिषद हद्दीतील विविध विकासकामांसाठी तब्बल १ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील रखडलेल्या तसेच आवश्यक असलेल्या विविध विकासकामांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगर विकास शाखेकडून वरणगाव नगरपरिषदेला संबंधित कामांचे परिपूर्ण प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसह, जागेच्या उताऱ्यासह तसेच योजनेच्या निकषांनुसार सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता मंजूर कामांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी नगरपरिषद प्रशासनाला पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

कुठे होणार कामे ?
या निधीतून शहरातील विविध प्रभागांमध्ये रस्ते काँक्रिटीकरणाची कामे प्रस्तावित आहेत. विकास शांताराम माळी यांच्या घरापासून चंदू झोपे यांच्या घरापर्यंतचा रस्ता, प्रभाग क्रमांक ३ मधील रस्ता, शिवाजीनगर श्री पार्क परिसरातील विकास नामदेव तायडे यांच्या घरापासून मनोहर बावणे यांच्या घरापर्यंतचा रस्ता तसेच अयोध्यानगरमधील अभि सरोदे यांच्या घरापासून नरेंद्र मांगो झोपे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.

याशिवाय जुन्या नगरपालिकेच्या इमारतीत लायब्ररी व अभ्यासिका उभारण्यासाठी फर्निचर आणि पुस्तके उपलब्ध करून देण्याचे काम प्रस्तावित आहे. पिंपळमळा परिसर, प्रभाग क्रमांक ७, प्रभाग क्रमांक ८ दलित वस्ती योजनेअंतर्गत चिरंजीत उज्जैनवाल यांच्या घरापासून कडू साबळे ख्वाजा नगर प्रवेशद्वारापर्यंत रस्ता कॉक्रिटीकरण करणे प्रभाग क्रमांक आठ दलित वस्ती योजनेअंतर्गत विनोद चांदने यांच्या घरापासून तर पवन कुमार यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रेटीकरण करणे, मच्छी मार्केट पासून तर बेबाबाई इंगळे यांच्या घरापर्यंत गटार बांधकाम करणे,तसेच सिद्धेश्वरनगरातील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरणही निधीतून केले जाणार आहे.

विकासकामांना मिळणार गती – –
वरणगाव शहरातील अनेक भागांमध्ये रस्ते व मूलभूत सुविधांबाबत नागरिकांकडून सातत्याने मागण्या होत असताना १ कोटी ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने या कामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र मंजूर निधीचा नियोजित कामांसाठी प्रभावी व पारदर्शक वापर करून कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे आव्हान नगरपरिषद प्रशासनासमोर राहणार आहे.

दरम्यान, वरणगाव शहरासाठी १ कोटी ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपनगराध्यक्षा अरुणाताई इंगळे व भाजप तालुका सरचिटणीस राजेश इंगळे यांनी मंत्री संजय सावकारे यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या